Sarkari Naukri: 10 वी पास ते MBA उमेदवारांसाठी राज्य विद्युत उत्पादन निगम लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरची संधी
कारण राज्य विद्युत उत्पादन निगम लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकर भरती करण्यात येणार आहे.
जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण राज्य विद्युत उत्पादन निगम लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकर भरती करण्यात येणार आहे. ही नोकरीची संधी उत्तर प्रदेशासाठी आहे. तर UPRVNL यांनी असिस्टंट इंजिनिअर, अकाउंट ऑफिसर, सहाय्यक समीक्षा अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट सारख्या विविध पदांसाठी नोकर भरती करण्यात येणार आहे. तर एकूण 353 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. असिस्टंट इंजिनिअर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्ष असावे. तर अन्य पदांसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी वयाची अट 21 वर्ष ठेवण्यात आले आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, निवड झालेल्या उमेदवाराला 3 लाख रुपयांपर्यंत वेतन मिळणार आहे. या पदासाठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर या संबंधित अधिक माहिती देण्यात आली आहे. तसेच अर्ज प्रक्रिया सुद्धा सुरु करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 मार्च देण्यात आली आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा प्रथम इंटरव्यु घेतला जाणार आहे. त्यानंतर कप्युटर आधारित परिक्षा द्यावी लागणार आहे.(7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांना मिळणाऱ्या शैक्षणिक भत्त्यासंदर्भातील 'हे' नियम तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या)
कंपनीच्या 353 रिक्त पदांसाठी होणाऱ्या नोकरभरतीसाठी 10 वी पास ते एमबीए उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. यामध्ये असिस्टंट इंजिनिअरिंग पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना इंजिनिअरिंगमध्ये 64 टक्के पास करणे अनिवार्य आहे. तसेच टेक्निकल ग्रेड संबंधित होणाऱ्या नोकर भरतीसाठी आयटीआयसह 10 वी परिक्षेत उत्तीर्ण झाल्याचे अनिवार्य आहे.