Sarkari Naukari Update: मोदी सरकार पुढील दीड वर्षात 10 लाख नोकर्‍या देण्याच्या तयारीत; PM Narendra Modi यांचे मंत्रालयांना निर्देश

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या घोषणेमुळे तरूनांमध्ये नवा जोश येईल असे ट्वीट करत अमित शाह म्हणाले आहेत.

PM Narendra Modi | (File Image)

नोटाबंदी, कोरोना संकट यामुळे अनेकांच्या नोकर्‍यांवर गदा आली. आर्थिक घडी देखील विस्कटलेली आहे. देशात महागाई आणि बेरोजगारी वाढत असताना आज केंद्र सरकार कडून या परिस्थितीत एक आशेचा किरण दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मिशन मोड वर पुढील दीड वर्षात 10 लाख नोकर्‍या देण्यासाठी कामाला लागण्याचे निर्देश दिले आहे. आज विविध मंत्रालयांना आणि सरकारी विभागांना हे निर्देश देण्यात आले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध मंत्रालयाच्या ह्युमन रिसॉर्स विभागाचा आढावा घेतला आहे अशी माहिती PMO कडून देण्यात आली आहे.

देशातील बेरोजगारीच्या प्रश्नावरून सातत्याने सरकारवर विरोधकांकडून टीका होत आहे. त्यावरूनच आता सरकारने हा निर्णय घेतला आहे. देशात अनेक सरकारी कार्यालयांमध्ये पदं रिक्त आहेत. त्याचे आकडे समोर देखील आणण्यात आले आहेत. त्यावरून आता मोदींनी ह्युमन रिसॉर्स चा आढावा घेत मिशन मोड वर पदं भरण्यासाठी प्रयत्न करावेत असे सुचवल्याचे ट्वीट करून सांगण्यात आले आहे. Ministry of Home Affairs Recruitment 2022: केंद्रीय गृह मंत्रालयात विविध पदांसाठी भरती, प्रति महिना तब्बल 1,12,400 रुपये पगार; घ्या जाणून .

मागील वर्षी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना दिलेल्या माहितीनुसार, १ मार्च २०२० पर्यंत केंद्र सरकारच्या विभागांमध्ये ८.७२ लाख पदे रिक्त आहेत. केंद्र सरकारच्या सर्व विभागांमध्ये एकूण ४० लाख ४ हजार पदे आहेत, त्यापैकी सुमारे ३१ लाख ३२ हजार कर्मचारी नियुक्त आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या घोषणेमुळे तरूनांमध्ये नवा जोश येईल असे ट्वीट करत अमित शाह म्हणाले आहेत.