Chandrashekhar Guruji Murder: 'सरळ वास्तू' फेम चंद्रशेखर गुरुजी यांची कर्नाटकमध्ये हत्या, मारेकरी CCTV मध्ये कैद
कर्नाटक राज्यातील हुबळी (Hubballi) जिल्ह्यातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये मंगळवारी (5 जुलै) सकाळी चंद्रशेखर गुरुजी यांची हत्या करण्यात आली.
सरळ वास्तू (Saral Vastu) फेम चंद्रशेखर गुरुजी (Chandrashekhar Guruji) यांची हत्या करण्यात आली आहे. कर्नाटक राज्यातील हुबळी (Hubballi) जिल्ह्यातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये मंगळवारी (5 जुलै) सकाळी चंद्रशेखर गुरुजी यांची हत्या करण्यात आली. चंद्रशेखर गुरुजी यांचे नाव चंद्रशेखर अंगडी (Chandrashekhar Angadi) असे होते. मात्र त्यांना चंद्रशेखर गुरुजी नावाने ओळखले जात असे. 'सरळ-वास्तू' हा त्यांचा कार्यक्रम विविध वृत्तवाहिन्यांतून प्रसारीत होत असे. त्यामुळे ते वृत्तवाहिन्या आणि त्याच्या वास्तू प्रयोगांमुळे घराघरांमध्ये पोहोचले होते.
हुबळी येथील हॉटेलमध्ये मारेकऱ्यांनी चाकूने भोसकत चंद्रशेखर यांची हत्या केली.हुबळी येथील प्रेसिडेंट हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांना तातडीने केआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांना संशय आहे की, काही व्यावसायिक बैठकीनिमित्त गुरुजी हे हॉटेलमध्ये आले होते. (हेही वाचा, घरातील स्वयंपाकघर कोणत्या दिशेला असावे व का? जाणून घ्या वास्तुतज्ज्ञ विशाल डोके यांच्याकडून)
ट्विट
हॉटेलमध्ये असलेल्या सीसीटीव्हीमध्ये संपूर्ण घटना कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मारेकरी चाकूने भोसकून चंद्रशेखर गुरुजी यांची हत्या करताना दिसत आहे. कर्नाटक पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत.