Sankashti Chaturthi Wishes in Marathi: संकष्टी चतुर्थी दिवशी गणपती बाप्पाची आराधना, या शुभेच्छा Messages, WhatsApp Status द्वारे द्या शुभेच्छा
पौराणिक कथेनुसार, गणपतीचा हा 'द्विजप्रिय' अवतार अतिशय मोहक असून तो भक्तांच्या हाकेला लवकर धावून येतो असे मानले जाते.
लाडक्या बाप्पाच्या भक्तांसाठी संकष्टी चतुर्थी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी 'द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी' साजरी केली जात आहे. संकष्टी म्हणजे संकटांचा नाश करणारी तिथी. या दिवशी गणपतीची भक्तीभावाने पूजा केल्यास जीवनातील अडथळे दूर होऊन सुख-समृद्धी लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. महाराष्ट्रात विशेषतः मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर यांसारख्या शहरांमध्ये गणेश मंदिरांमध्ये आज भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
संकष्टी चतुर्थी: पूजा विधी आणि नियम
संकष्टी चतुर्थीचा उपवास हा सूर्योदयापासून सुरू होऊन चंद्रोदयानंतर सोडला जातो. या दिवशी खालीलप्रमाणे विधी करणे फलदायी ठरते:
पहाटेचे स्नान: सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि गणपतीसमोर उपवासाचा संकल्प करावा.
अथर्वशीर्ष पठण: शक्य असल्यास गणपती अथर्वशीर्षाचे २१ वेळा पठण करावे. यामुळे मनाला शांती आणि सकारात्मकता मिळते.
नैवेद्य: बाप्पाला लाल जास्वंदाचे फूल आणि दुर्वांची जुडी अर्पण करावी. मोदक किंवा लाडूचा नैवेद्य दाखवणे अत्यंत शुभ मानले जाते.
चंद्र दर्शन: रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला अर्घ्य देऊन आणि बाप्पाची आरती करून उपवास सोडावा.
आप्तलष्टांसाठी खास मराठी शुभेच्छा (Sankashti Chaturthi Wishes in Marathi)
धार्मिक महत्त्व
पौराणिक कथेनुसार, गणपतीचा हा 'द्विजप्रिय' अवतार अतिशय मोहक असून तो भक्तांच्या हाकेला लवकर धावून येतो असे मानले जाते. फेब्रुवारी महिना (फाल्गुन वद्य चतुर्थी) हा ऋतू बदलाचा काळ असल्याने या उपवासाने शरीराची शुद्धी होण्यासही मदत होते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)