Sandeshkhali Case: शेख शाहजहान यांना अटक करा; संदेशखाली प्रकरणात कोलकाता हायकोर्टाचे पश्चिम बंगाल सरकारला निर्देश

तृणमूल काँग्रेसचे (Trinamool Congress) नेते शेख शाहजहान (Sheikh Shahjahan) यांना तत्काळ अटक करण्याचे निर्देश कोलकाता उच्च न्यायालयाने (Calcutta High Court) दिले आहेत. शेख यांच्यावर पश्चिम बंगालमधील संदेशखाली (Sandeshkhali Case) येथील लैंगिक अत्याचार आणि जमीन बळकावल्या आरोप आहे.

Sheikh Shahjahan | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

तृणमूल काँग्रेसचे (Trinamool Congress) नेते शेख शाहजहान (Sheikh Shahjahan) यांना तत्काळ अटक करण्याचे निर्देश कोलकाता उच्च न्यायालयाने (Calcutta High Court) दिले आहेत. शेख यांच्यावर पश्चिम बंगालमधील संदेशखाली (Sandeshkhali Case) येथील लैंगिक अत्याचार आणि जमीन बळकावल्या आरोप आहे. त्यांना तत्काळ अटक व्हावी यासाठी विरोधात असलेल्या भाजपने जोरदार रान उठवले आहे. दरम्यान, एक याचिका कोर्टात दाखल झाली. ज्यावर सुनावणी घेताना कोर्टाने हे निर्देश दिले. तसेच, या प्रकरणात दप्तरदिरंगाई दर्शवल्याबद्दल कोर्टाने पोलीस आणि तपास अधिकाऱ्यांवरही ताशेरे ओढले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 मार्च रोजी सुनावणी सुरू राहणार आहे.

'अटकेस स्थगिती दिल्याचा आभास'

संदेशखाली प्रकरणात दाखल प्रकरणात पश्चिम बंगाल पोलिसांनी तपासात दर्शवलेला संतपणा पाहून हायोकर्टाने आश्चर्य व्यक्त केले. या प्रकरणातत आतापर्यंत 42 आरोपपत्रे झाली आहेत. तरीही कोणतीही कारवाई पुढे करण्यात आली नाही. यावर कोर्टाने शहाजहानच्या अटकेला प्रतिबंध करणारा कोणताही स्थगिती आदेश नसल्याचे स्पष्ट केले आणि त्याच्या अटकेच्या आवश्यकतेवर जोर दिला. अटकेस स्थगिती देण्याचे अंतरिम आदेश दिल्यासारखे चुकीचे आभास निर्माण केले गेले आहे. परंतू, रेकॉर्डवर प्रत्यक्षात तसे काहीच दिसत नाहीत. त्यामुळे त्याला अटक करण्यात यावी, असे खंडपीठाने म्हटले आहे. दरम्यान, शेख शाहजहांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू झाल्याची माहिती देणाऱ्या वृत्तपत्रांमध्ये सार्वजनिक सूचना जारी करण्यासही न्यायालयाने अधिकाऱ्यांना सांगितले. शिवाय, कलम 144 अन्वये निर्बंध असतानाही राजकारण्यांनी या भागात भेट दिली. याकडे लक्ष वेधत न्यायालयाने विचारले की, "लोक चिडलेले असताना शेकडो लोकांनी तिथे जाण्याची काय गरज आहे? (हेही वाचा, BJP Leader Arrested: भाजप नेत्यास अटक, वेश्याव्यवसाय रॅकेट चालवल्याचा आरोप)

लैंगिक अत्याचार आणि जमीन बळकावल्याचा आरोप

तृणमूल काँग्रेस नेते शाजहान शेख आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध लैंगिक अत्याचार आणि जमीन बळकावल्याच्या आरोपानंतर संदेशखालीतील अशांतता वाढली आहे. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाकडे त्यांच्याविरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ज्यात आदिवासी कुटुंबांकडून "लैंगिक अत्याचार आणि जमीन बळकावण्याच्या" 50 घटनांचा समावेश आहे. दरम्यान, जानेवारीमध्ये अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांवर झालेल्या हिंसक हल्ल्यानंतर शाहजहान अटक टाळण्यासाठी अज्ञातवासात गेला आहे. सोमवारी महिला आंदोलकांनी तृणमूल काँग्रेसचे नेते शंकर सरदार यांच्या निवासस्थानाची तोडफोड केल्याच्या घटनांसह निदर्शने, जाळपोळ आणि तोडफोड यासारख्या घटनांमुळे हा प्रदेश अशांततेने ग्रासलेला आहे. (हेही वाचा, Republic TV Journalist Arrested: संदेशखाली येथे रिपब्लिक टीव्हीशी संबंधित पत्रकाराला पश्चिम बंगाल पोलिसांकडून अटक)

राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने सांगितले की, त्यांना टीएमसी नेता आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध आदिवासी कुटुंबांकडून “लैंगिक अत्याचार आणि जमीन हडपण्याच्या” 50 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांना सुमारे 1,250 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, ज्यात 400 जमिनीच्या समस्यांशी संबंधित आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now