सामंत गोयल RAW Chief तर अरविंद कुमार Intelligence Bureau चे नवे संचालक
रॉ' ही संस्था शत्रू राष्ट्रांच्या कारवायांवर लक्ष ठेवणारी गुप्तहेर संस्था आहे. पराराष्ट्रांप्रमाणे देशांतर्गत हिंसाचार, देशविरोधी कारवायांवर लक्ष ठेवण्याचं काम आय बी करते. 1984 बॅचच्या सामंत गोयल आणि अरविंद कुमार यांची भारताच्या दोन महत्त्वाच्या गुप्तचर यंत्रणा प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.
पाकिस्तान विरोधात उरीचा सर्जिकल स्ट्राईक, बालकोट येथील दुसरा सर्जिकल स्ट्राईक या हल्ल्यातील स्ट्रॅटिजिस्टपैकी एक सामंत गोयल (Samant Goel) यांची RAW च्या प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली तर अरविंद कुमार (Arvind Kumar) यांच्यावर IB च्या संचालकपदाची जबाबदारी सोपावण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षपदाखालील समितीने सामंत गोयल आणि अरविंद कुमार यांची निवड केली आहे. अरविंद कुमार हे आसाम-मेघालय केडरचे आयपीएस अधिकारी असून अनेक वर्षांपासून आयबीसाठी ते काम करत आहेत. तर सामंत गोयल हे 1984 बॅचचे आयपीएस अध्यक्ष आहेत. Pulwama Terror Attack ते Surgical Strike 2 चा घटनाक्रम,भारतीय वायुसेनेने उद्ध्वस्त केले दहशतवाद्यांचे अड्डे
रॉ' ही संस्था शत्रू राष्ट्रांच्या कारवायांवर लक्ष ठेवणारी गुप्तहेर संस्था आहे. पराराष्ट्रांप्रमाणे देशांतर्गत हिंसाचार, देशविरोधी कारवायांवर लक्ष ठेवण्याचं काम आय बी करते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)