Rajasthan Political Crisis: सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री, राजस्थान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवले- रणदीप सिंह सुरजेवाला यांची घोषणा
जयपूर (Jaipur) च्या फेअरमाँट हॉटेलमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक सुरु आहे. काँग्रेस सदस्यांच्या बैठकीत तब्बल 102 आमदारांनी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी केली होती यानुसार आता सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री पदावरून हटवण्यात आल्याचे समजत आहे.
[Poll ID="null" title="undefined"]राजस्थानातील सत्तासंघर्षांत (Rajsthan Political Crisis) आता एक मोठा ट्विस्ट आला आहे. जयपूर (Jaipur) च्या फेअरमाँट हॉटेलमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक सुरु आहे. काँग्रेस सदस्यांच्या बैठकीत तब्बल 102 आमदारांनी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी केली होती यानुसार आता सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री पदावरून हटवण्यात आल्याचे समजत आहे. याशिवाय सचिन पायलट यांना राजस्थान कॉंग्रेस (Rajsthan Congress) प्रदेशाध्यक्ष पदावरून सुद्धा काढून टाकण्यात आले आहे त्यांच्या जागी गोविंद सिंह दोस्तरा यांची नेमणूक करण्यात आली आहे. या संदर्भात रणजीत सिंह सुरजेवाला (Randeep Singh Surjewala) यांनी अधिकृत घोषणा केली आहे.सचिन पायलट यांनी सरकाविरोधी बंडाचा पवित्रा स्वीकारल्याने राजस्थान मध्ये अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्या सरकारला धोका निर्माण झाला होता याच वादातून हा निर्णय घेण्यात आल्याचे समजतेय.
माध्यमांच्या माहितीनुसार, सचिन पायलट यांनी स्वत:साठी मुख्यमंत्रीपद मागितल्याचे म्हटले आहे. त्याशिवाय सचिन पायलट यांनी काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश पांडे यांना हटवण्याची आणि महत्त्वाच्या पदांवर आपल्या माणसांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती.ही घोषणा केल्यावर सुरजेवाला यांनी माध्यमांशी संंवाद साधताना म्हंटले की,सचिन पायलट यांंच्या सारखे नेते आणि आमदार भाजप च्या षडयंत्रात भटकले गेले आहेत,त्यांनी राजस्थानच्या 8 कोटी जनतेने निवडलेल्या सरकारला धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे. हे अस्वीकार्य आहे त्यामुळे पायलट यांंना पदावरुन काढुन टाकण्यात आले आहे.
ANI ट्विट
दरम्यान, काँग्रेसच्या विरुद्ध पवित्रा स्वीकारला असला तरी भाजपात प्रवेश करण्याचा हेतू नसल्याचे मागेच सचिन पायलट यांनी स्पष्ट केलं होतं. मागील काही दिवसांपासून पायलट यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुद्धा काँग्रेस तर्फे करण्यात आला होता. आज यासाठी विधिमंडळ बैठकीला उपस्थित राहावे असेही सांगण्यात आले होते मात्र सचिन पायलट यांच्या सहित अन्य २२ आमदार आज बैठकीसाठी आले नाही परिणामी पक्षाकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे समजतेय.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)