Sabarimala Temple: शबरीमला यात्रेकरूंना दिले जाते होते टॉयलेटच्या पाण्यात तयार केलेले अन्न; अयप्पा सेवा संघाने रंगेहात पकडले (Watch Video)
यानंतर महसूल व आरोग्य विभागाने मिळून या खाद्यपदार्थांच्या स्टॉलची पाहणी केली. तपासणीनंतर फूड स्टॉलला स्टॉप मेमो देण्यात आला आहे.
Food Cooked in Toilet Water: केरळमधील (Kerala) सत्ताधारी सीपीआयएमच्या युवा शाखेचे नेते अब्दुल शमीम यांच्यावर शबरीमाला (Sabarimala) मंदिरात येणाऱ्या यात्रेकरूंना शौचालयाच्या पाण्यात शिजवलेले अन्न दिल्याचा आरोप आहे. अय्यप्पा सेवा संघाचा दावा आहे की त्यांनी शमीमला कृत्य करताना रंगेहात पकडले आहे. आरोपी अब्दुलविरुद्ध महसूल दक्षता पथक व आरोग्य विभागाने गुन्हा दाखल केला आहे. एरुमेली येथे अब्दुल शमीम हा फूड स्टॉल चालवत होता. हा खाद्यपदार्थाचा स्टॉल केरळच्या प्रतिष्ठित सबरीमाला मंदिराच्या मार्गावर आहेत. यात्रेच्या वेळी अब्दुलच्या फूड स्टॉलवरून मोठ्या संख्येने यात्रेकरू जातात आणि येथे भोजन करतात.
अय्यप्पा सेवा संघाने वाटेत येणाऱ्या या भागाचा आढावा घेतला. त्यानंतर या स्टॉलमध्ये शौचालयाच्या पाण्यात शिजवलेले अन्न यात्रेकरूंना दिले जात असल्याचा संघाने दावा केला आहे. तपासणीत या फूड स्टॉलवर शेजारील शौचालयाचे पाणी पाईपद्वारे आणून ते चहा व लिंबू सरबत बनवण्यासाठी वापरत असल्याचे आढळून आले.
आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरू लागल्याने अय्यप्पा सेवा संघाला या फूड स्टॉलवर संशय आला. त्यानंतर तपासणी केला असता, इथले पदार्थ शौचालयाच्या पाण्यात बनवले जात असल्याचे आढळले. रिपब्लिक टीव्हीच्या वृत्तानुसार, शेजारच्या बाथरूममधून एक निळा पाईप बाहेर आला आणि शीतपेय विक्रीच्या स्टॉलवर गेला. सुरुवातीला स्टॉल मालकाने दावा केला की टॉयलेटचे पाणी फक्त भांडी धुण्यासाठी वापरले जाते, स्वयंपाकासाठी नाही. मात्र समोर आलेले पुरावे काही वेगळेच सांगत होते.
पहा व्हिडिओ-
आरोपी सुमारे दोन आठवड्यांपासून भगवान अय्यप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना शौचालयाच्या पाण्याचा वापर करून तयार केलेले जेवण देत असल्याचेही उघड झाले आहे. यानंतर महसूल व आरोग्य विभागाने मिळून या खाद्यपदार्थांच्या स्टॉलची पाहणी केली. तपासणीनंतर फूड स्टॉलला स्टॉप मेमो देण्यात आला आहे. या दुकानाला अखाद्य वस्तू विकण्याचा तात्पुरता परवाना देण्यात आला होता. मात्र, हा विक्रेता त्या नियमाचेही उल्लंघन करत होता. (हेही वाचा: Bharat Gaurav Train Food Poisoning: भारत गौरव ट्रेन मध्ये 40 प्रवाशांना विषबाधेचा संशय; पुणे स्थानकात उपचारानंतर सारे ससून रूग्णालयात दाखल)
याबाबत पोलिसांना वारंवार फोन करूनही गुन्हा दाखल झाला नाही.एरुमेलीच्या विशेष महसूल पथकाचे प्रभारी अधिकारी बिजू जी नायर आणि नायब तहसीलदार बिजू जी नायर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप तपास सुरू आहे. येत्या काही दिवसांत आणखी तपासणी करण्याचे नियोजन असल्याचे नायर यांनी सांगितले.