Rules changes from 1st November: आजपासून बदलणार 'हे' नियम, सामान्यांच्या शिखावर होणार थेट परिणाम
Rules changes from 1st November: आज म्हणजेच 1 नोव्हेंबर पासून देशभरातील विविध गोष्टींसंदर्भातील नियमात बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात याचा कुठेतरी परिणाम होऊ शकतो. तर सिलेंडर बुकिंग ते ट्रेनच्या वेळापत्रकात बदल होणार आहे. तसेच एसबीआयच्या बचत खात्यावरील व्याजात ही कपात होणार आहे. या व्यतिरिक्तडिजिटल पेमेंटवर कोणतेही शुल्क आकारला जाणार नाही आहे. या सर्व गोष्टींचा विचार केला असता एकूण सामान्य व्यक्तिच्या शिखावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच काही दिवसातच दिवाळी सुद्धा साजरी केली जाणार आहे. त्यामुळे आर्थिक बजेट कोलमडू नये म्हणून नागरिकांनी आधीच या बदललेल्या नियमांकडे जरुर एकदा लक्ष द्या.
नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच LPG सिलेंडरच्या डिलिव्हरी प्रक्रियेत बदल होणार आहे. तेल कंपन्या डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (DAC) सिस्टिम लागू करणार आहे. म्हणजेच सिलेंडरची खरेदी करणाऱ्या ग्राहकाला तो घरी डिलिव्हरी करण्यापूर्वी त्याला रजिस्टर मोबाईल क्रमांकावर ओटीपी प्राप्त होणार आहे. त्यामुळे ज्या वेळी तुमच्या घरी सिलेंडर येईल त्यावेळी तुम्हाला ओटीपी दाखवावा लागणार आहे. तसेच एखाद्या ग्राहकाचा मोबाईल क्रमांक अपडेटेड नसल्यास डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तिकडून उपलब्ध असलेल्या अॅपच्या माध्यमातून तत्काळ स्वरुपात नंबर अपडेट करुन घेऊ शकता.(Onion Price Update: गोवा सरकार रेशनकार्ड धारकांना कांदा प्रतिकिलो 32 रूपये दराने उपलब्ध करून देणार)
तसेच बँक ऑफ बडोदा च्या ग्राहकांना मर्यादित लिमिटनुसार अधिक पैसे काढणे किंवा भरण्यावर चार्ज वसूल केला जाणार आहे. सुरु खाते, कॅश क्रेडिट लिमिट आणि ओवरड्राफ्ट अकाउंट मधून जमा केलेले पैसे काढणे आणि बचत खात्यामधून ही पैसे काढल्यास त्यावर वेगवेगळे शुल्क आकारले जाणार आहेत. कर्ज खात्यासाठी महिन्यातून तीन वेळा जेवढ्या वेळेस अधिक पैसे काढल्यास तर ग्राहकांना प्रत्येकवेळी 150 रुपये द्यावे लागणार आहेत. तसेच बचत खात्यात तीन वेळेस पैसे जमा केल्यास त्यावर कोणताही शुल्क आकारला जाणार नाही. मात्र चौथ्या वेळेस ग्राहकांना 40 रुपये द्यावे लागणार आहेत.
आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे एसबीआय ने ज्या खात्यात एक लाख रुपयांपर्यंत रक्कम असल्यास त्यावर 0.25 टक्क्यांनी घट करत 3.25 टक्के व्याज दिले जाणार आहे. तसेच एक लाखांहून अधिक रक्कम खात्यात असलेल्या ग्राहकांना रेपो रेटनुसार व्याज दिला जाणार आहे. डिजिटल पेमेंटवर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही आहेत. मात्र पंन्नास करोड रुपयांहून अधिक टर्नओव्हर असलेल्या उद्योजगांसाठी डिजिटल पेमेंट वापरणे अनिवार्य असणार आहे.(Banking Service: बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी; आता 1 नोव्हेंबर 2020 पासून पैसे जमा करणे व काढण्यासाठी भरावे लागेल शुल्क- Reports)
तर आजपासून रेल्वेचे वेळापत्रक सुद्धा बदलले जाणार आहे. यापूर्वी ऑक्टोंबर महिन्यातच या संदर्भात बदल करण्यात येणार होते. मात्र ती तारीख वाढवली गेली. त्यामुळेच 1 नोव्हेंबर पासून रेल्वेचे नवे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. याच पार्श्वभुमीवर 13 हजार प्रवासी आणि सात हजार मालभाड्यांच्या ट्रेनच्या वेळापत्राक बदल होणार आहे. देशातील 30 राजधान्यांमध्ये सुद्धा वेळापत्रक बदल केले जाणार आहेत. या व्यतिरिक्त महाराष्ट्रात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या वेळेस सुद्धा बदल केले गेले आहेत.