RSS On Reservations: समाजातील भेदभाव संपेपर्यंत आरएसएसचा आरक्षणास पाठिंबा- मोहन भागवत
आमचा त्याला सर्वोतोपरी पाठिंबा (RSS Support for Reservation) आहे, आरएसएसप्रमुखांनी म्हटले आहे. संविधानात प्रदान केलेल्या आरक्षणांना आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे, असेही ते पुढे म्हणाले
Mohan Bhagwat On Reservations: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महत्त्वाचे भाष्य केले आहे. आमच्या समाजव्यवस्थेने समजातील एका मोठ्या घटकाला पाठिमागे ठेवेले आहे. हे मागासलेपण तब्बल 2000 वर्षे सुरु राहिले आहे. त्यामुळे समाजामध्ये या घटकांना समानता मिळावी यासाठी विशेष उपाययोजना करावी लागेल. आरक्षण ही सुद्धा एक उपाययोजनाच आहे. त्यामुळे समाजातील भेदभाव दूर होत नाही तोपर्यंत आरक्षण सुरु ठेवावे. आमचा त्याला सर्वोतोपरी पाठिंबा (RSS Support for Reservation) आहे, आरएसएसप्रमुखांनी म्हटले आहे. संविधानात प्रदान केलेल्या आरक्षणांना आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे, असेही ते पुढे म्हणाले.
मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा दाखला देत वृत्तसंस्था एएनआयने म्हटले आहे की, समजातील तब्बल 2000 वर्षांहून अधिक काळ समाजाचील अनेक घटक वंचीत आहेत. त्यामुळे ते समाजव्यवस्थेत खूपच पाठीमागे राहिले आहेत. अशा वेळी त्यांना समाजिक भेदभावांचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांना व्यवस्थेत सोबत घेण्यासाठी आम्ही (ज्यांनी भेदभाव केला नाही) आणखी 200 वर्षे त्रास का सहन करु शकत नाही? या समुदयांना बरोबरीची संधी मिळेपर्यंत आरक्षणासाराख्या उपाययोजना आवश्यक असून त्या सुरुच राहिल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले आहेत.
उल्लेखनीय असे की, मोहन भागवत यांचे वक्तव्य त्याच वेळी आले आहे जेव्हा महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखी एकदा प्रकर्षाने पुढे आला आहे. मनोज जरांगे हे जालना जिल्ह्यातील एका गावी उपोषणाला बसले आहेत. राज्य सरकारवर प्रचंड दबाव आहे. केंद्रात आणि राज्यात आरएसएस मातृसंस्था असलेल्या भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, भागवत यांनी स्पष्ट केले की 2000 वर्षांहून अधिक काळ समाजातील काही घटक दुर्लक्षित होते आणि सामाजिक व्यवस्थेत मागे राहिले होते.
मोहन भागव व्हिडिओ
दरम्यान, एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना भागवतांनी 'अखंड भारत' किंवा अविभाजित भारताच्या संकल्पनेबद्दलही भाष्य केले. यावेळी सध्याच्या तरुण पिढीच्या वयात लक्षणीय वाढ होण्याआधी हे चित्र प्रत्यक्षात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 1947 मध्ये भारतापासून वेगळे झालेल्यांना आता त्यांच्या निर्णयाचा पश्चाताप होत असून भारताशी पुन्हा एकत्र येण्याची इच्छा असल्याचेही ते म्हणाले.