अयोध्या प्रकरणी निकालानंतर देशात सुव्यवस्था राखण्यासाठी RSS देणार कार्यकर्त्यांना खास नियमावली
हा निकाल जाहीर झाल्यावर देशात कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित संभाव्य भीती लक्षात घेता आरएसएस कडून कार्यकर्त्यांसाठी नियमावली देण्यात आली आहे.
अयोद्धा (Ayodhya) राम मंदिर (Ram Mandir),आणि बाबरी मस्जिद (Babri Masjid) हा प्रदीर्घ काळापासून सुरु असणारा खटला म्हणून पहिला जातो. साहजिकच या खटल्यातील कारवायांवर सर्वांचेच लक्ष लागून असते परिणामी वेळोवेळी त्याचे पडसाद सुद्धा समाजात उमटताना दिसून आले आहेत. याप्रकरणी अंतिम निकाल आता शेवटच्या टप्प्यात असून याबाबत येत्या काहीच दिवसात सुनावणी होणार असल्याची शक्यता आहे. हा निकाल जाहीर झाल्यावर देशात कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित संभाव्य भीती लक्षात घेता आरएसएस (RSS) कडून कार्यकर्त्यांसाठी नियमावली देण्यात आली आहे. बुधवार, 30 ऑक्टोबर पासून यासंबंधित चर्चा करण्यासाठी छतरपूर येथे सभा घेण्यात आली होती यामध्ये भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी उपस्थिती दर्शवली.
ANI वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, आरएसएसने सूचना देतानाच या खटल्याच्या सुनावणी नंतरच्या संभाव्य भीतीवर भाष्य केले होते. मात्र देशात खळबळ होणार हे जरी निश्चित असले तरीही कोणत्याच कार्यकर्ताने किंवा भारतीयाने अन्य धार्मिक समुदायाच्या भावना दुखावू नयेत, तसेच हिंसक रूपात कुठेही कोणत्याही समुदायाला त्रास देऊन नये असे देखील सूचित करण्यात आले आहे. या निकालानंतर तुम्ही आनंद साजरा करणार असाल तर आनंद साजरा करणे असेल याची खबरदारी घेणे आवश्यक आहे असे या सभेत सांगण्यात आले.
दरम्यान, या सभेतून जम्मू काश्मीर आणि लेह लडाख मधून कलम 370 हटवल्याच्या विषयावर देखील चर्चा घेण्यात आली. योगायोगाने लडाखला केंद्रशासित प्रदेश म्ह्णून घोषित करण्याच्या दिवशीच ही सभा पार पडली होती. या सभेतील आरएसएसच्या सभासदाने दिलेल्या प्रतिक्रीयेनुसार, या प्रदेशांना केंद्रशासित म्ह्णून घोषित केल्याने येत्या काळात देशाच्या उद्गारात त्यांचा देखील हातभार लागणार आहे. आज, शुक्रवारी 1 नोव्हेंबर रोजी ही सभा समाप्त झाली.