Bharat Petroleum भागिदारी विक्रीसाठी बोली लागण्याची शक्यता, रशिया सरकारची कंपनी Rosneft , सौदीची अरामको, यूएईची ADNOC उत्सुक
आता भारत पेट्रोलियमची भागिदारी खरेदी केल्यावर देशातील तेल किमतीवर रशीयन कंपनीची मोठी भूमिका राहू शकते. रशीयाची कंपनी जगातील सर्वात मोठे आणि तिसऱ्या क्रमांकाचे असलेल्या तेलाच्या बाजारपेठेत आपले पाय वेगाने पसरण्याच्या प्रयत्नात आहे.
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (Bharat Petroleum Corporation Limited ) या भारत सरकारच्या तेल उत्पादक कंपनीच्या विक्रीसाठी लवकरच बोली लागू शकते. ही कंपनी विकत घेण्यासाठी रोजनेफ्ट ( Rosneft ) ही रशिया (Russia) सरकारची कंपनी भारत पेट्रोलियमसाठी बोली लावण्यास इच्छुक असल्याचे वृत्त आहे. सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात रोजनेफ्ट कंपनीने तशी इच्छाही बोलून दाखवल्याचे म्हटले आहे. रोजनेफ्ट कंपनीचे सीईओ इगोर सेचिन यांनी भारताचे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याशी बुधवारी चर्चा केली. दरम्यान, भारत पेट्रोलियम (Bharat Petroleum) कंपनीतील हिस्सेदारी विकून केंद्र सरकार 60,000 कोटी रुपये कमावण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.
गुजरात राज्यातील जामनगर येथे असलेल्या दुसऱ्या सर्वात मोठ्या खासगी तेल कंपनीत रोजनेफ्ट कंपनीने आगोदरच आपली भागिदारी घेतली आहे. आता भारत पेट्रोलियमची भागिदारी खरेदी केल्यावर देशातील तेल किमतीवर रशीयन कंपनीची मोठी भूमिका राहू शकते. रशीयाची कंपनी जगातील सर्वात मोठे आणि तिसऱ्या क्रमांकाचे असलेल्या तेलाच्या बाजारपेठेत आपले पाय वेगाने पसरण्याच्या प्रयत्नात आहे.
रोजनेफ्टचे सीईओ इगोर सेचिन यांनी बुधवारी सकाळीच पेट्रोलियमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याशी चर्चा केली. मोदी सरकारच्या खासगीकरणाच्या योजनेत सर्वात मोठा हिस्सा हा बीपीसीएलच्या खासगीकरणाचाही आहे. सरकार या कंपनीला आपली 53 टक्के पूर्ण भागिदारी विकण्याचा विचार करत आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती ठेवणाऱ्या सूत्रांच्या हवाल्याने वृत्त देत इंडियन एक्सप्रेसने म्हटले आहे की, सेचिन यांनी सर्वात आधी धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत सकाळची न्याहरी करताना चर्चा केली. त्यानंतर पुन्हा एकदा ते आपल्या प्रतिनिधींसह त्यांना भेटले. या वेळी त्यांनी भारत पेट्रोलियम कंपनीसाठी बोली लावण्याची इच्छा व्यक्त केली. (हेही वाचा, Eveready आता वॉरन बफे यांच्या Duracell कंपनीच्या मालकीची? 1700 कोटी रुपयांना व्यवहार झाल्याची चर्चा)
दरम्यान, भारत पेट्रोलियमसाठी सैदी तेल कंपनी अरमाको सुद्धा बोली लाऊ शकते. एका सरकारी अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, भारत पेट्रोलियम तेल कंपनीसाठी अरामको, यूएई ची ADNOC या कंपन्याही बोली लावण्याची शक्यता आहे.