फाटलेली जीन्स तरुणवर्ग सांभाळेल पण फाटलेल्या अर्थव्यवस्थेचे काय? उर्मिला मातोंडकर हिची मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्यावर टीका
अशातच या फॅशन वरुन नुकत्याच उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी एक वादग्रस्त विधान आहे. त्यावर आता देशभरातील महिलांनी संताप व्यक्त केला आहे.
Ripped Jeans Statement: गेल्या काही दिवसंपासून रिप्ड जीन्स म्हणजेच फाटलेल्या जीन्सचा सध्या तरुणांमध्ये त्याच्या ट्रेन्ड आहे. अशातच या फॅशन वरुन नुकत्याच उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat) यांनी एक वादग्रस्त विधान आहे. त्यावर आता देशभरातील महिलांनी संताप व्यक्त केला आहे. गेल्या मंगळवारी रावत यांनी नशेच्या पदार्थांच्या सेवनावर आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसांच्या कार्यशाळेच्या उद्घाटनासाठी पोहचले होते. त्याच दरम्यान रावत यांनी रिप्ड जीन्स वर वादग्रस्त विधान करत असे म्हटले की, फॅशनकडे तरुणांचा कल हा त्यांना आपल्या संस्कृतीपासून दूर करत आहे. यावरच आता शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी ट्विट करत टीका केली आहे.
उर्मिला मातोंडकर यांनी ट्विट करत असे म्हटले आहे की, मान्यवर फाटलेली जीन्स तर देशातील तरुण वर्ग सांभाळेल. पण फाटलेली अर्थव्यवस्था त्याचे काय? असा सवाल करत त्यांच्यावर टीका केली आहे. त्याचसोबत शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सुद्धा रावत यांच्या वादग्रस्त विधानावरुन त्यांना सुनावले आहे.(सोशल मीडियातील महिलांचे न्यूड फोटो 24 तासात हटवावे-रविशंकर प्रसाद)
Tweet:
दरम्यान, तीरथ सिंह रावत यांनी एका विधानात असे ही म्हटले मी NGO चालवणाऱ्या एका महिलेला भेटलो. त्यावेळी तिने रिप्ड जीन्स घातली होती. ते पाहून मी हैराण झालो. अशा पद्धतीच्या महिला समजाच्या समस्या सोडवण्यास आल्या तर समाजावर काय परिणाम होईल? पुढे असे ही म्हटले की, हे सर्व काही आपल्या घरापासून सुरु होते आणि मुल तेच शिकतात जे आपल्या घरी पाहतात. त्यामुळे घरातील मुलांना योग्य संस्कार दिले तर ते अयशस्वी होत नाहीत. तेव्हा ते किती ही आधुनिक असो. परंतु यामुळेच आता नवा वाद सुरु झाला असून महिलांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये बॉलिवूड मधील प्रसिद्ध महिलांचा सुद्धा समावेश आहे.