Isha Ambani and Anand Piramal Become Parents of Twins: ईशा अंबानी, आनंत पिरामल यांना जुळी अपत्यप्राप्ती, मुकेश अंबानी झाले आजोबा; नातवंडांची नावे आडिया आणि कृष्णा

"आम्हाला हे सांगताना आनंद होत आहे की आमची मुले ईशा आणि आनंद यांना 19 नोव्हेंबर 2022 रोजी सर्वशक्तिमानाने जुळ्या मुलांचा आशीर्वाद दिला आहे," मीडिया स्टेटमेंटमध्ये वाचले आहे.

Isha Ambani and Anand Piramal

अब्जाधीश मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची मुलगी ईशा अंबानी (Isha Ambani) आणि पती आनंद पिरामल (Anand Piramal) जुळ्या मुलांचे पालक (Parents Of Twins) झाले आहेत. "आम्हाला हे सांगताना आनंद होत आहे की आमची मुले ईशा आणि आनंद यांना 19 नोव्हेंबर 2022 रोजी सर्वशक्तिमानाने जुळ्या मुलांचा आशीर्वाद दिला आहे," मीडिया स्टेटमेंटमध्ये वाचले आहे. ईशा अंबानी रिलायन्स रिटेलच्या संचालक आहेत. आनंद पिरामल यांच्यासोबत त्यांचा काही वर्षांपूर्वी  विवाह झाला होता.

ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्याकडून आलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ईशा अंबानीने एक मुलगा आणि एका मुलीला जन्म दिला आहे. "ईशा आणि बाळं, लहान मुलगी आडिया आणि लहान मुलगा कृष्णा दोघेही छान आहेत." ईशा अंबानी आणि आनंद पिरामल हे दोघे डिसेंबर 2018 मध्ये मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानी 'अँटिलिया' निवासस्थानी पारंपारिक समारंभात विवाहबद्ध झाले होते. या लग्नाला अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती दर्शवली लावली होती.

ट्विट

दरम्यान, ईशा अंबानी रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी आहे. ती सध्या जिओ आणि रिलायन्स रिटेलमधील संचालक मंडळाची सदस्य आहे. आनंद पिरामल हे प्रिमल ग्रुपचे कार्यकारी संचालक आहेत. त्यांचा आर्थिक सेवा व्यवसाय सध्या भारतातील सर्वात मोठा आणि वैविध्यपूर्ण NBFC आहे.