Reliance Jio कंपनीत कॉस्ट कटींग, पाच हजार कर्मचारी बेरोजगार
आमची कंपनी विविध योजनांवर वेगवेगळ्या कंपन्यांसोबत काम करते. या कंपन्या विशिष्ठ कालावधीसाठी या कर्मचाऱ्यांची नियुक्त्या करतात. आम्ही सातत्याने लोकांची भरती करतो. मात्र, कॉस्ट कटींगमुळे कर्मचाऱ्यांना कमी केले जात आहे. हे वृत्त खरे नाही.' दरम्यान, या प्रकाराशी संबंधीत लोकांचे म्हणने आङे की, कंपनीने आतापर्यंत 5000 लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. ज्यात 500 ते 600 स्थानिक कर्मचारी होते.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या जगप्रसिद्ध Reliance Jio कंपनीत कॉस्ट कटींग प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) कंपनी व्यवस्थापनाच्या या निर्णयामुळे कंपनीतील सुमारे 5000 हजार कर्मचाऱ्यांवर नोकरी गमाविण्याची वेळ आली आहे. कंपनीने जानेवारी ते मार्च या कालावधीत कंपनी उत्पन्नामध्ये झालेली घट (Operating margin) विचारात घेऊन हा निर्णय घेतल्याचे समजते. इकॉनॉमिक टाइम्स या वृत्तपत्राच्या हवाल्याने जनसत्ता डॉट कॉमने याबाबत वृत्त दिले आहे.
दरम्यान, कंपनीने मात्र हे वृत्त फेटाळून लावले आहे. जिओच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, 'रिलायन्स जिओ बाजारात सातत्याने नेट रिक्रूटर राहिली आहे. आमची कंपनी विविध योजनांवर वेगवेगळ्या कंपन्यांसोबत काम करते. या कंपन्या विशिष्ठ कालावधीसाठी या कर्मचाऱ्यांची नियुक्त्या करतात. आम्ही सातत्याने लोकांची भरती करतो. मात्र, कॉस्ट कटींगमुळे कर्मचाऱ्यांना कमी केले जात आहे. हे वृत्त खरे नाही.' दरम्यान, या प्रकाराशी संबंधीत लोकांचे म्हणने आङे की, कंपनीने आतापर्यंत 5000 लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. ज्यात 500 ते 600 स्थानिक कर्मचारी होते. (हेही वाचा, RCOM- Jio Deal: रिलायन्स कम्युनिकेशन्सकडून स्पेक्ट्रम खरेदी न झाल्यास महराष्ट्रासह अन्य 7 राज्यात जिओच्या सेवेला फटका बसणार)
नाव न सांगण्याच्या अटीवर एका व्यक्तीच्य हवाल्याने वृत्त देताना जनसत्ता डॉट कॉमने म्हटले आहे की, आपापल्या टीममधील लोकांची कपात करण्याबाबत कंपनीने मॅनेजर पदावर नियुक्त असलेल्या व्यक्तींना सांगितले आहे. यात अॅडमिनिस्ट्रेशन, सप्लाय चेन, आर्थिक विभाग आणि एचआर आदी मंडळी रडारवर आहेत. सूत्रांच्या हवाल्याने या वृत्तातम म्हटले आहे की, जिओमध्ये 15,000-20,000 कर्मचारी पे-रोल वर नियुक्त आहेत. तर इतर कर्मचारी हे थर्ड पार्टी एम्लॉई आहेत.