प्रेयसीचा अबोला; प्रियकराकडून तिच्या नाकाचा कडकडून चावा

सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. तर आलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपी केशवलाल याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

Boyfriend bites his ex-girlfriend nose in Ahmedabad | (Photo Credits: File Image)

गुजरात येथील अहमदाबाद (Ahmedabad) येथील चांदखेडा (Chandkheda) परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका तरुणाने चक्क एका तरुणीच्या नाकाचा चावा घेतला. प्राप्त माहितीनुसार पीडित तरुणी ही चावा घेतलेल्या तरुणाची माजी प्रेयसी (Girlfriend)आहे. पाठिमागील दोन वर्षापासून तिने या तरुणासोबत बोलणे तोडले होते. प्रेयसी बोलत नसल्याने तरुण दु:खी आणि चिडचीडा झाला होता. रागाच्या भरात त्याने प्रेयसीच्या नाकाचा कडकडून चावा घेतल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मंजू परमार (Manju Parmar)(वय 24 वर्षे) ही तरुणी राजस्थान येथील उदयपूर जिल्ह्यातील खेरवाडा तालुक्यात राहणारी आहे. पोलिसांना माहिती देताना मंजूने सांगितले की, तिचे केशवलाल (Keshavlal Bodat) नावाच्या एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, दरम्यानच्या काळात ती चांदखेडा येते राहण्यास आली. तेव्हापासून तिने केशवलाल याच्यासोबत बोलणे कमी केले आणि पुढे हळूहळू बंदच केले.

पोलिसांना माहिती देताना मंजूने पुढे म्हटले आहे की, चांदखेडा येथे मंजू एका कंस्ट्रक्शन साईटवर काम करत होती. ती काम करत असलेल्या साईटवर केशवलाल याचा मित्र दिनेश हासुद्धा काम करण्यासाठी आला. मित्रासोबत केशवलालही तिथे (कंस्ट्रक्शन साईट) आला आणि तो मंजू हिच्यावर पाळत ठेऊ लागला. ही घटना घडली त्या दिवशी सकाळच्या प्रहरी मंजू नैसर्गिक विधीसाठी गेली होती. दरम्यान, केशवलालने तिला एकटीला पकडण्याचा प्रयत्न केला. (हेही वाचा, ठाणे: प्रियकराच्या मदतीने बायकोने केली पतीची हत्या, मृतदेह हॉस्पीटलमध्ये नेऊन रचला अपघाताचा बनाव)

दरम्यान, केशवलाल याला विरोध करत तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला. तसेच, यापूढे आपण तुझ्याशी संबंध ठेऊ शकत नाही, असेही तीने त्याला सांगितले. मंजूचे शब्द ऐकून केशवलालने तिला घट्ट पकडले आणि तिच्या नाकाचा कडाडून चावा घेतला. या घटनेत मंजूच्या नाकाला गंभीर दुखापत झाली. वेदना असहय्य झाल्याने मंजूने आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून काही लोग घटनास्थळी पोहोचले. लोकांना पाहून केशवलालाने मंजूला सोडून घटनास्थलावरुन पळ काढला.

प्रत्यक्षदर्शींनी आणि नातेवाईकांनी मंजू हिला नाकावरील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. तर आलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपी केशवलाल याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.