Red Fort Violence: Deep Sidhu सोबत कोणताही संबंध नाही, Sunny Deol सह काही शेतकरी नेत्यांनी केलं स्पष्ट
भारतीय किसान युनियन हरियाणा युनिटचे प्रमुख Gurnam Singh Chaduni यांनी प्रतिक्रिया देताना दीप सिंधूने शेतकर्यांना मिस गाईड आणि हिंसेसाठी प्रवृत्त केल्याचं म्हटलं आहे.
60 दिवसांपेक्षा जास्त काळ शांततेमध्ये आंदोलन करणारे शेतकरी काल ट्रॅक्टर रॅली दरम्यान आक्रमक झाल्याचं सार्या जगाने पाहिलं. दरम्यान निर्धारित वेळेच्या आधीच रॅली सुरू करत आणि पोलिसांनी नेमून दिलेल्या मार्गाचा वापर न करता अनेक ट्रॅक्टर दिल्लीत घुसले थेट लाल किल्ल्यावर (Red Fort) त्यांनी आपले झेंडे फडकावले. या दरम्यान झालेल्या हिंसचारामध्ये पंजाबी अभिनेता दीप सिंधू याचं नावं सातत्याने पुढे येत आहे. त्याचे काही फोटो सोशल मीडीयामध्ये शेअर केले जात आहे. त्यापैकी एक म्हणजे दीप सिंधू (Deep Sindhu) आणि अभिनेता, भाजपा नेता सनी देओल. मात्र ट्वीटरच्या माध्यमातून खुलासा करत सनीने दिलेल्या माहितीनुसार त्याचा आणि त्याच्या कुटुंबियांचा दीप सिंधूशी कोणताही संबंध नाही. दरम्यान काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीप सिंधूने लाल किल्ल्यावर जाऊन आपला झेंडा फडकावला आणि त्यावेळी त्याने फेसबूक लाईव्ह देखील केले. मात्र या घटनेनंतर तो शेतकरी आंदोलनाशी संबंधित नसल्याचं अनेक शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केलं आहे.
सनी देओल ट्वीट
राकेश तिकीत यांचं मत
राकेश तिकीत यांनी दिलेल्या माहितीनुसार दीप सिंधू हा सीख नसून भाजपाचा कार्यकर्ता आहे. ही एका धर्माची लढाई नव्हे तर केवळ शेतकर्यांची चळवळ आहे आणि ती कायम राहील. ज्यांचा हिंसाचारात सहभाग होता त्यांचा शेतकरी आंदोलनाशी संबंध नसेल. (हे देखील नक्की वाचा: Red Fort: राजधानी दिल्ली येथे लाल किल्ला परिसरात सुरक्षा वाढवली, काही मेट्रो स्टेशन बंद; इतर ठिकाणी जनजीवन, सेवा सामान्य.)
शेतकरी नेत्यांचं मत
भारतीय किसान युनियन हरियाणा युनिटचे प्रमुख Gurnam Singh Chaduni यांनी प्रतिक्रिया देताना दीप सिंधूने शेतकर्यांना मिस गाईड आणि हिंसेसाठी प्रवृत्त केल्याचं म्हटलं आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली काही शेतकरी लाल किल्ल्यावर गेले आम्हांला तेथे कधीच जायचं नव्हते. दरम्यान स्वराज अभियानच्या योगेंद्र यादव यांनी देखील लाल किल्ल्यावरील हिंसाचाराला दीप सिंधूला जबाबदार धरलं आहे.