Property Sale In Coronavirus: घर घेताय? कोरोनाने लावलाय गृह खरेदी विक्री व्यवहारांना ब्रेक; दिल्ली, पुणे, कोलकातासह प्रमुख शहरांत मागणी घटली

गल्या वर्षी जुलै ते सप्टेंबर या तिमाहिती 55,080 इतकी घरे विकली गेली होती. यंदा हा आकडा केवळ 29,520 इतकाच आहे. महत्त्वाचे म्हणजे ही आकडेवारी केवळ दिल्ली राजधानी परिसर (एनसीआर), कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद व पुणे या प्रमुख सात शहरांमधला आहे. यात मुंबई शहराची आकडेवारी समाविष्ठ नाही.

Property Sale | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

घर (Home) हा जवळपास प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय. घर घेण्यासाठी माणूस काय काय नाही करत. त्यामुळेच तर देशाच्या अर्थव्यवस्थेत रिअल इस्टेट (Real Estate) क्षेत्र वेगळा आब राखून आहे. असे असेल तरी कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाने या आपला काहीशी घरघर लागली आहे. अॅनॉरॉक नावाच्या संस्थेने दिलेली आकडेवारी या क्षेत्रातील सध्याची अवस्था दर्शवते. देशभरातील प्रमूख सात शहरांमध्ये जुलै ते सप्टेंबर या काळात घरविक्री 46 टक्क्यांनी घटली आले. दिल्ली (Delhi) राजधानी परिसर (एनसीआर), कोलकाता (Kolkata), चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद व पुणे (Pune) या शहरांत या तिमाहीत (जुलै ते सप्टेंबर) केवळ 29,520 इतकीच घरे विकली गेली आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गृहविक्रीत तब्बल 25,560 घरांची घट झाली आहे. गल्या वर्षी जुलै ते सप्टेंबर या तिमाहिती 55,080 इतकी घरे विकली गेली होती. यंदा हा आकडा केवळ 29,520 इतकाच आहे. महत्त्वाचे म्हणजे ही आकडेवारी केवळ दिल्ली राजधानी परिसर (एनसीआर), कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद व पुणे या प्रमुख सात शहरांमधला आहे. यात मुंबई शहराची आकडेवारी समाविष्ठ नाही. महाराष्ट्र टाइम्सने अॅनारॉकच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, नवीन घर किंवा फ्लॅट खरेदी करताना या गोष्टी नक्की तपासा)

दरम्यान, यंदाच्या वर्षी पहिली तिमाही गृहविक्री क्षेत्रासाठी फायदेशीर ठरली. पहिल्या तिमाहीत 45,200 घरांची विक्री झाली. हे प्रमाण गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत अधिक आहे. मात्र दुसऱ्या तिमाही आणि त्यानंतर म्हणजेच जानेवारी ते सप्टेंबर या काळात घर विक्रीमध्ये जवळपास 57 टक्क्यांची घट झाली. गेल्या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर या काळात झालेल्या घर विक्रीचा आकडा हा 2,02,200 इतका होता. हाच आकडा यंदाच्या वर्षी 87,460 इतका आहे. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत याच काळात



संबंधित बातम्या

South Africa vs Pakistan 1st ODI 2024 Live Streaming: आज पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात होणार चुरशीची लढत, येथे जाणून घ्या भारतात कधी अन् कुठे पाहणार थेट प्रक्षेपण

Zimbabwe vs Afghanistan ODI Stats: वनडे सामन्यात झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात कसा आहे विक्रम, येथे जाणून घ्या हेड टू हेड, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडूंची आकडेवारी

IND W vs WI W 2nd T20I 2024 LIVE Streaming: आज मालिका जिंकण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज, तर वेस्ट इंडिजचे लक्ष पहिल्या विजयाकडे; त्याआधी जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना

ZIM vs AFG 1st ODI 2024 Live Streaming: टी-20 नंतर झिम्बाब्वे-अफगाणिस्तान वनडे मालिकेत येणार आमनेसामने, आज खेळवण्यात येणार पहिला सामना; तुम्ही 'येथे' पाहून घ्या सामन्याचा आनंद