Andhra Pradesh Crime: विम्याचे पैसे मिळण्यासाठी बहिणीची हत्या; आंध्र प्रदेशमधून रिअल इस्टेट एजंटला अटक

आंध्र प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बहिणीच्या विम्याचे पैसे मिळण्यासाठी रिअल इस्टेट एजंटने तिची हत्या केल्याचे घडले आहे. या प्रकरणी आरोपी एजंटला अटक केली आहे.

Death प्रतिकात्मक फोटो Photo Credit- X

Andhra Pradesh Crime: आंध्र प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बहिणीच्या विम्याचे पैसे मिळण्यासाठी रिअल इस्टेट एजंटने (Real Estate Businessman) तिची हत्या (Murder)केल्याचे घडले आहे. या प्रकरणी आरोपी एजंटला अटक केली आहे. मालपती अशोक कुमार रेड्डी असे आरोपीचे नाव आहे. तर, मालपती संध्या असे बहिणीचे नाव आहे. 1 कोटी रुपयांच्या विम्याची रक्कम मिळवण्यासाठी त्याने तिची हत्या केली. कर्जबाजारी असलेल्या अशोक रेड्डी यांनी नोव्हेंबर 2023 मध्ये संध्याच्या नावाने 73 लाख रुपयांच्या विमा पॉलिसी घेतल्या होत्या. त्याव्यतिरिक्त त्यांच्या 1.13 कोटी रुपयांच्या विद्यमान पॉलिसीही घेतल्या होत्या. (AC Compressor Explosion In Gujarat: हृदयद्रावक! गुजरातमधील मुंद्रा येथे एसी कॉम्प्रेसरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत वडील आणि दोन मुलींचा मृत्यू)

4 फेब्रुवारी 2024 रोजी तो संध्या हिला वैद्यकीय तपासणीच्या बहाण्याने ओंगोले येथे घेऊन गेला. त्याने तिला झोपेच्या गोळ्या दिल्या. ज्यामुळे ती बेशुद्ध झाली आणि नंतर पोडिली शहराजवळ तिचा गळा दाबून खून केला. खूनाची घटना लपवण्यासाठी त्याने गाडी झाडावर आदळली आणि संध्याचा अपघातात मृत्यू झाल्याचा बनाव रचला. दुसऱ्या दिवशी, त्याचे वडील मलापती तिरुपथिया यांनी पोडिली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि गुन्हा दाखल करण्यात आला.

त्याशिवाय, पोलिस तपासात आरोपीने फॉरेन्सिक अहवालांमध्ये झेडझाड केल्याचे आढळून आले. यात सरकारी रुग्णालयातील कर्मचारी युसूफ आणि अशोक रेड्डी या दोघांनी त्याची मदत केल्याचे आढळून आले. विमा रेकॉर्ड आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी अशोक रेड्डी यांना अटक केली. युसूफसह दोन साथीदार अजूनही फरार आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement