RBI चा बॅंकांना दणका; 1 ऑक्टोबर पासून ATM मध्ये नोटा नसल्यास होणार दंडाची कारवाई
हे स्टेटमेंट RBI च्या इश्यू डिपार्टमेंटला पाठवले जाईल.
आरबीआय (RBI) कडून आता जर एटीएम सेंटर (ATM Center) मध्ये पैसे नसतील तर त्यांना दंड ठोठावला जाईल अशी माहिती दिली आहे. आरबीआयचा हा दणका बॅंकांना 1 ऑक्टोबर 2021 पासून बसणार आहे. जर एका महिन्यात 10 तासांपेक्षा अधिक तास नोटा उपलब्ध नसतील त्यांना दहा हजारांचा दंड बजावला जाणार आहे. दरम्यान अनेकदा बॅंकांच्या एटीएम मध्ये नोटा उपलब्ध नसल्याने ग्राहकांची गैरसोय होते. तसेच अकाऊंट असलेल्या बॅंकेव्यतिरिक्त इतर बॅंकेच्या एटीएम मधून ग्राहकांनी पैसे काढल्यास विशिष्ट मर्यादेनंतर ग्राहकांनाही दंड बसतो. त्यामुळे आता बॅंकांना त्यांच्या एटीएम बद्दल अधिक सतर्क रहावं लागणार आहे. नक्की वाचा: ATM Transaction Fee Hike: RBI कडून एटीएम ट्रान्झॅक्शन वर आकारण्यात येणार्या चार्ज मध्ये केली वाढ; पहा 1 जानेवारी 2022 पासून किती असेल शुल्क.
बॅंकांना देखील त्यांच्या एटीएम मध्ये नोटा का उपलब्ध नाहीत? याचं उत्तर आरबीआयला द्यावं लागणार आहे. काल (10 ऑगस्ट) आरबीआय ने जारी केलेल्या नोटिफिकेशन मध्ये रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की एटीएममध्ये रोख रक्कम नसल्यास, सिस्टम जनरेटेड स्टेटमेंट द्यावे लागणार आहे. हे स्टेटमेंट RBI च्या इश्यू डिपार्टमेंटला पाठवले जाईल.
दरम्यान अपडेट नुसार, जून 2021 च्या शेवट पर्यंत देशामध्ये विविध बॅंकांची मिळून 2,13,766 ATMs आहेत. एटीएम यंत्रांमधील नोटांच्या उपलब्धतेवर कायम लक्ष ठेवण्याचे आदेश भारतीय रीझर्व्ह बँकेन सर्व बँकाना दिले असून एटीएम यंत्रांमधील नोटा संपण्याआधीच नवा भरणा मशीनमध्ये करावा आणि लोकांची गैरसोय होणार नाही याकडे लक्ष द्यावं, असं आरबीआयनं बँकांना सांगितलं आहे.