कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी Digital Payment चा वापर करण्याचे RBI चे आवाहन; NEFT, IMPS, UPI सेवा चोवीस तास सुरु

देशातील कोरोना विषाणूच्या (Corona Virus) वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त करत, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) लोकांना पेमेंटसाठी नोटांच्या बदल्यात, डिजिटल माध्यमांचा अवलंब करण्याची सूचना केली आहे

Rerserve Bank of India. (Photo Credit: PTI)

देशातील कोरोना विषाणूच्या (Corona Virus) वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त करत, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) लोकांना पेमेंटसाठी नोटांच्या बदल्यात, डिजिटल माध्यमांचा अवलंब करण्याची सूचना केली आहे. केंद्रीय बँकेने असे म्हटले आहे की, NEFT, IMPS, UPI आणि BBPS असे अनेक पर्याय वस्तू किंवा सेवा खरेदीसाठी, बिल देयके आणि निधी हस्तांतरणासाठी चोवीस तास उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे नोटांचा वापर करण्याऐवजी डिजिटल माध्यमांचा वापर करण्याचे आवाहन आरबीआयने केले आहे. सामाजिक संपर्क कमी करण्यासाठी तसेच जनतेला सार्वजनिक ठिकाणी कमी भेट द्यावी लागावी म्हणून आरबीआयने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

याबाबत बोलताना आरबीआयने सांगितले, 'पेमेंटसाठी लोकांना त्यांच्या सहकारितानुसार मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, कार्ड इत्यादींसारखे डिजिटल पेमेंट मोड वापरणे शक्य आहे. यामुळे लोकांना पैसे काढण्यासाठी किंवा व्यवहारासाठी गर्दीच्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाहीत.’ रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सोमवारी सांगितले की, केंद्रीय बँक बँकांना आणि ग्राहकांना शक्य तितक्या डिजिटल बँकिंग सुविधांचा वापर करण्यास प्रोत्साहित करीत आहे.

सप्टेंबर 2019 मध्ये, आरबीआयने इंटरऑपरेबल प्लॅटफॉर्मला सर्व पुनःपुन्हा भरण्यात येणारी बिले स्वीकारण्यास परवानगी दिली आहे. यामध्ये शालेय फी, विमा प्रीमियम आणि नगरपालिका कर समाविष्ट असू शकतात. 2019 मध्ये, आरबीआयने एनईएफटी आणि आरटीजीएसमार्फत होणाऱ्या व्यवहाराचे शुल्क काढून टाकण्याची घोषणा केली, जी जानेवारी 2020 पासून लागू झाली. अशाप्रकारे आरबीआयने ग्राहकांना डिजिटल पेमेंट सुकररित्या वापरण्यासाठी अनेक सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे सध्याच्या काळात ग्राहकांनी डिजिटल पेमेंटवर भर द्यावे असे आरबीआयचे सांगणे आहे. (हेही वाचा: YES Bank खातेदारांसाठी आनंदवार्ता! बँकेच्या सर्व सेवा 18 मार्च पासून होणार पुर्ववत)

दरम्यान कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशातील बर्‍याच राज्यांत शाळा, महाविद्यालये, मॉल्स, जलतरण तलाव, जिम, सिनेमागृह अशी गर्दीची ठिकाणे 31 मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय हवाई सेवा देखील बंद करण्यात आल्या आहेत. रेल्वे स्थानक व गाड्यांचे स्वच्छता करण्याचे काम केले जात आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now