2000 ची नोट खरंच व्यवहारातून बंद होणार का ? केंद्र सरकार आणि आरबीआय यांनी घेतलाय 2000 च्या नोटांबद्दल एक मोठा निर्णय
नव्या निर्णयानुसार 2000 रूपयाच्या नोटांची छपाई आता अत्यल्प स्तरावर आणली आहे.
Rs 2000 Note: दोन वर्षांपूर्वी मोदी सरकारने नोटाबंदीचा (Demonetisation) निर्णय घेऊन अचानक व्यावहारातील 500 आणि 1000च्या नोटा बंद केल्या. त्यानंतर नव्या 500 आणि 2000च्या नोटा बाजारात आणल्या. मात्र आता व्यवहारात 2000ची नोट कमी दिसत आहेत. RBI आणि केंद्र सरकारने या बाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. नव्या निर्णयानुसार 2000 रूपयाच्या नोटांची छपाई आता अत्यल्प स्तरावर आणली आहे. गुरूवारी अर्थमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकार्याने ही माहिती दिली आहे.
2000 ची नोट बंद होणार का ?
सुरूवातीला आलेल्या काही बातम्यांमध्ये 2000 रूपयाची नोट बंद होणार असे वृत्त पसरवण्यात आले होते. मात्र सरकारने या नोटा बंद करण्याऐवजी आता त्याची छपाई कमी करण्यात आल्याने व्यवहारात कमी झाल्या आहेत. मार्च 2017 च्या शेवटच्या महिन्यात 328.5 कोटी नोटा व्यवहारामध्ये होत्या. 31 मार्च 2018 पर्यंत आता त्यामध्ये केवळ अत्यल्प वाढ होऊन नोटांची व्यवहारातील संख्या 336.3 कोटी झाली आहे.
8 नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळेस बंद करण्यात आलेल्या 500 आणि 1000च्या व्यवहारातून बंदकेलेल्या नोटांचा व्यवहारातील प्रमाण 86% होते. नोटाबंदीच्या निर्णयावरून देशभरात सामान्यांपासून अर्थतज्ञांपर्यंत सार्यांनीच मोदींवर टीका केली.