RBI MPC June 2025: कर्ज घेणार्यांना RBI कडून Repo Rate मध्ये कपात करत पुन्हा दिलासा
फेब्रुवारी 2025 पासून, RBI ने पॉलिसी रेपो दरात सलग 100 बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. आता त्यांनी आपला दृष्टिकोन 'accommodative' वरून 'neutral' करण्याचा निर्णय झाला आहे.
आरबीआय ने आज पुन्हा रेपो रेट मध्ये कपात करत कर्ज घेणार्यांना दिलासा दिला आहे. Governor Sanjay Malhotra यांनी Monetary Policy Committee कडून रेपो रेट मध्ये 50 बेसिस पॉईंट्स ने कपात करत तो 5.50% केल्याची माहिती दिली आहे. "पॉलिसी रेपो दरावर चर्चा करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी आणि विकसित होत असलेल्या macro-economic and financial developments चे तपशीलवार मूल्यांकन करण्यासाठी आणि पुढील आर्थिक दृष्टिकोनासाठी 4-6 जून रोजी चलनविषयक धोरण समितीची बैठक झाली. एमपीसी कडून तातडीने पॉलिसी रेपो दर 50 बेसिस पॉइंट्सने कमी करून 5.5 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे," असे त्यांनी जाहीर केले आहे.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला, RBI च्या सहा सदस्यीय चलनविषयक धोरण समितीने (MPC) 25-बेसिस-पॉइंट दर कपातीची घोषणा केली. आर्थिक मंदीच्या काळात मे 2020 नंतर एमपीसीने पहिली दर कपात जाहीर केली तेव्हा फेब्रुवारीमध्ये नवी दर कपात सायकल सुरू झाली.
रेपो रेट मध्ये पुन्हा कपात
फेब्रुवारी 2025 पासून, RBI ने पॉलिसी रेपो दरात सलग 100 बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. आता त्यांनी आपला दृष्टिकोन 'accommodative' वरून 'neutral' करण्याचा निर्णय झाला आहे.
संजय मल्होत्रा म्हणाले की, महागाई लक्षणीयरीत्या कमी झाली आहे, तसेच मध्यवर्ती बँकेच्या 4 % च्या लक्ष्याशी जुळणार्या महागाईबाबत दिलासा आहे. कोअर चलनवाढ देखील सौम्य राहण्याची अपेक्षा आहे.