RBI Monetary Policy: Repo आणि Reverse Repo Rate मध्ये बदल नाही; FY21-22 साठी GDP Growth 10.5% चा अंदाज

तर आर्थिक वर्ष 2021-22 साठी देशाचा जीडीपी ग्रोथ रेट (GDP Growth Rate) 10.5% राहण्याचा अंदाज दर्शवला आहे.

RBI Governor Shaktikanta Das. (Photo Credits: ANI)

यंदाचं केंद्रीय बजेट जाहीर झाल्यानंतर आज (5 फेब्रुवारी) पहिल्यांदाच आरबीयने त्यांचं पतधोरण (RBI Monetary Policy) जाहीर केले आहे. यामध्ये भारताचे गर्व्हरनर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी रेपो रेट किंवा रिव्हर्स रेपो रेट मध्ये कोणताही बदल केला नसल्याचं म्हटलं आहे. तर आर्थिक वर्ष 2021-22 साठी देशाचा जीडीपी ग्रोथ रेट (GDP Growth Rate)  10.5% राहण्याचा अंदाज दर्शवला आहे. त्यामुळे आता त्यामुळे आता रेपो रेट (Repo Rate)  4 टक्के तर रिव्हर्स रेपो रेट (Reverse Repo Rate) 3.35 टक्क्यांवरच राहणार आहे.

दरम्यान मागील वर्षभराच्या काळाने आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या आहेत. 2020 ने आपल्या ताकदीची परीक्षा घेतली आहे पण 2021 मध्ये आपण नवा अध्याय लिहू शकू अशी आशा व्यक्त करताना पुढील वर्षभरासाठी आपला जीडीपी ग्रोथ रेट 10.5% असेल असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे येत्या वर्षात आपली प्रगती दिशेने राहील आणि तो आलेख चढता असेल असा विश्वास देखील वर्तवला आहे.

डिसेंबर 2020 मधील सरकारी माहितीच्या आधारे किरकोळ महागाई दर कमी होऊन 4.59 टक्क्यांवर आला आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये किरकोळ महागाई दर 6.93 टक्के होता. दरम्यान आज शक्तिकांत दास यांनी दोन टप्प्यात सीआरआर वाढवला जाणार आहे अशी माहिती दिली आहे. पहिल्या टप्प्यात 27 मार्च 2021 पर्यंत पासून तो 3.5% केला जाईल. तर दुसऱ्या टप्प्यात 22 मे 2021 पासून तो 4% केला जाईल.