रेमंडचे संस्थापक Vijaypat Singhania यांनी फेटाळले मुलगा गौतम याच्यासोबतच्या सलोख्याचे वृत्त
या फोटोवरुन सिघानिया पितापुत्रांमध्ये सुरु असलेला वाद आणि संघर्ष निवळल्याचे बोलले जाऊ लागले.
रेमंडचे संस्थापक (Raymond Founder) विजयपत सिंघानिया (Vijaypat Singhania) आणि त्यांचा मुलगा गौतम सिंघानिया (Gautam Singhania) यांच्या भेटीबाबत सोशल मीडियावर एक फोटो झळकला. या फोटोवरुन सिघानिया पितापुत्रांमध्ये सुरु असलेला वाद आणि संघर्ष निवळल्याचे बोलले जाऊ लागले. मात्र, हा संघर्ष कायम असून तो मिटल्याच्या चर्चा म्हणजे केवळ अपवा असल्याचे गौतम सिंघानिया यांनी म्हटले आहे. तसेच, या अफवांचे खंडण करताना सिंघानिया यांनी एक व्हिडिओच प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी नेमके काय घडले यावर प्रकाश टाकला आहे.
गौतम सिंघानिया यांच्याकडून सोशल मीडियावर पोस्ट
गौतम सिंघानिया यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यावरुन एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये त्यांनी आपल्या वडिलांसोबत फोटो शेअर केला होता. तसेच, फोटोसोबत लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, ''आज माझे वडील घरी आले. त्यांचे आशीर्वाद मिळाले याबाबत मी खूप आनंदी आहे.'' गौतम सिंघानिया यांची पोस्ट येताच सोशल मीडियावर या दोन्ही पितापुत्रांमध्ये समेट घडल्याची चर्चा सुरु झाली. त्यांच्या हितचिंतकांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या. दरम्यान, विजयपथ सिंघानिया यांच्याकडून जोरदार खंडण करण्यात आले. त्यांनी तातडीने खुलासा करत म्हटले की, आपल्या मुलासोबत सुरु असलेल्या संघर्षामध्ये कोणत्याही प्रकारचा समेट घडला नाही. आम्हा दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचा सलोखा राहिला नाही. (हेही वाचा, Gautam Singhania and Vijaypat Singhania : अखेर नऊ वर्षानंतर सिंघानिया पिता-पुत्र आले एकत्र; गौतम सिंघानियांनी ट्विट करत दिली माहिती)
विजयपत सिंघानिया यांनी फेटाळला दावा
विजयपत सिंघानिया यांनी व्हिडिओच्या माध्यमातून खुलासा करत नेमके काय घडले याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, एके दिवशी मला मुलगा गौतम सिंघानिया यांच्या सहाय्यकाचा फोन आला. त्याने गौतम यास आपणास भेटण्याची इच्छा असल्याचे सांगितले. तसेच, भेटीच्या नावाखाली घरी येण्याचे अवाहनही केले. दरम्यान, आपण कॉफी पिण्यासाठी नक्कीच घरी येऊ. मात्र, तिथे राहू शकणार नाही, असे सांगितले. तसेच, इच्छा नसतानाही आपण गौतमच्या घरी गेलो. तिथे आपण कॉफी प्यायलो आणि लगेच परत निघालो. दरम्यान, गौतम सिंघानिया यांनी आपल्यासोबत काही फोटो काढले. हे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर करत आमच्यात समेट घडल्याचा भास निर्माण केला. ज्यामुळे अनेकांची दिशाभूल झाली. (हेही वाचा, रेमंडचे Gautam Singhania यांची पत्नी नवाज मोदी सिंघानिया पासून वेगळे होण्याची घोषणा)
एक्स पोस्ट
काय आहे वाद?
विजयपत सिंघानिया यांनी रेमंड समूहाचे अध्यक्षपद सोडल्यानंतर आणि समूहाची सर्व सूत्रे मुलगा गौतम सिंघानिया यांच्याकडे हस्तांतरीत केल्यापासून हा वाद सुरु झाला. त्यानंतर विजयपत सिंघानिया यांनी मुंबईतील कुटुंबाच्या मालकीच्या जेके हाऊसमध्ये डुप्लेक्स नाकारल्याचा दावा केल्यावर मतभेद वाढले. ज्यामुळे त्यांना 2018 मध्ये रेमंडचे अध्यक्ष एमेरिटस म्हणून काढून टाकण्यात आले. तिथून पुढे हा वाद अधिकच वाढत गेला. गौतम सिंघानिया यांनी समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला तरीही विजयपत सिंघानिया आपल्या मुलाच्या हेतूबद्दल साशंक आहेत. पितापुत्रांमध्ये झालेल्या अलिकडील बैठकीचा उद्देश त्यांच्यातील मतभेद सोडवणे हा नव्हता. पण मुलाने चुकीच्या हेतूने ही भेट घडवून आणली असे सांगत हा तणाव अद्यापही कायम असल्याचे म्हटले.