Ravish Kumar & NDTV: एनडीटीव्हीतून राजीनामा दिल्यानंतर रवीश कुमार प्रथमच लोकांसमोर, युट्युब चॅनलच्या माध्यमातून व्यक्त केली सडेतोड भूमिका
या संवादाची माहिती रविश कुमार यांनी ट्विटर पोस्टद्वारे दिली आहे. तसेच, पोस्टसोबत Ravish Kumar Official या युट्युब चॅनलची लिंकही दिली आहे. याच चॅनलवरी व्हिडिओत रविश कुमार यांनी एनडीटीव्हीतून राजीनामा दिल्याची पार्श्वभूमी आणि कारण सांगितले आहे.
नवी दिल्ली टेलिव्हिजन (New Delhi Television) अर्थातच एनडीटीव्ही (NDTV) या माध्यमसंस्थेतून राजीनामा देऊन बाहेर पडल्यानंतर पत्रकार रवीश कुमार (Ravish Kumar) यांनी प्रथमच आपल्या चाहत्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी संवाद साधला आहे. या संवादाची माहिती रवीश कुमार यांनी ट्विटर पोस्टद्वारे दिली आहे. तसेच, पोस्टसोबत Ravish Kumar Official या युट्युब चॅनलची लिंकही दिली आहे. याच चॅनलवरी व्हिडिओत रवीश कुमार यांनी एनडीटीव्हीतून राजीनामा दिल्याची पार्श्वभूमी आणि कारण सांगितले आहे.
दरम्यान, रवीश कुमार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हिंदी भाषेत केलेल्या पोस्टचा मराठी भावार्थ असा की, माननीय जनता, माझ्या जडणघडणीत आपला सहभाग आहे. आपले प्रेम हीच माझी संपत्ती आहे. आपल्याच युट्युब चॅनलवरुन आपल्यासाठी एकतर्फी आणि एक प्रदीर्घ संवाद केला आहे. हाच माझा नवा पत्ता आहे. सर्व गोदी मीडियाच्या गुलामीसोबत लढायचे आहे - रवीश कुमार (हेही वाचा, NDTV-Adani Deal: प्रणॉय रॉय, राधिका रॉय यांचा एनडीटीव्ही प्रवर्तक पदाचा राजीनामा)
व्हिडिओ
एनडीटीव्हीचे संस्थापक आणि प्रवर्तक प्रणॉय रॉय आणि राधिका रॉय यांनी राजीनामा दिला. त्यांतर लोकप्रिय पत्रकार रवीश कुमार यांनीही एनडीटीव्हीचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर आपल्या पहिल्या प्रतिक्रियेत रवीश यांनी इतर प्रत्येक मीडिया चॅनेलचा उल्लेख गोदी मीडिया असा केला आणि आपल्या यूट्यूब चॅनेलवर सांगितले की, या देशात अनेक न्यूज चॅनेल आहेत. परंतु ते सर्व गोदी मीडिया आहेत. ते सर्व पत्रकारिता करण्याचा दावा करतात, परंतु पत्रकारितेच्या मूलभूत तत्त्वांसह त्यांनी सर्व काही संपवले आहे.
थोडक्यात पार्श्वभूमी
RRPR होल्डिंग ही एनडीटीव्हीची प्रवर्तक कंपनी आहे. RRPR होल्डिंगकडे NDTV मधील 29.18 टक्के हिस्सा आहे. हा हिस्सा आता उद्योगपती गौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी समूहाने घेतला आहे. याबाबत एक निवेदन प्रस्तुत करण्यात आले आहे.
"एनडीटीव्हीचे प्रवर्तक समूह वाहन आरआरपीआरएची एक बैठक 29 नोव्हेंबर रोजी पार पडली. या बैठकीनंतर प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांचा राजीनामा प्रवर्तक समूहाने मंजूर केला आहे, असे निवेदनात म्हटले आहे. "RRPRH ने नवीन संचालक म्हणून मान्यता सुदिप्ता भट्टाचार्य, संजय पुगलिया आणि सेंथिल सिन्निया चेंगलवरायन यांना बोर्डावर नवीन संचालक म्हणून तातडीने मान्यता दिली आहे," असे निवेदनात म्हटले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, AMG Media Networks Limited (AMNL) ची पूर्ण मालकीची उपकंपनी, विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड (VCPL) (जी अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड (AEL) ची 100 टक्के उपकंपनी आहे) ने अधिकारांचा वापर केला आणि NDTV ची प्रवर्तक समूह कंपनी RRPR होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड चे 99.5 टक्के इक्विटी शेअर्स संपादन केले.