Ranveer Allahbadia सह त्याच्या गर्लफ्रेंडला गोव्याच्या किनारी मिळालं जीवनदान; प्रशासकीय अधिकारी जोडप्याने दोघांना बुडताना वाचवलं
दरम्यान त्याने याकाळात त्याच्यावर देवाची, येशूची कृपा असल्याचं म्हटलं. तसंच आपण काही कारणासाठीच वाचलो आहोत असं म्हणत जीवनाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
युट्युबर आणि पॉडकास्टर Ranveer Allahbadia ज्याला अनेकजण म्हणून ओळतात त्याने इंस्टाग्राम वर गोव्यामध्ये त्याला नाताळ च्या सुट्ट्या समुद्रकिनारी एंजॉय करताना आलेला थरारक प्रकार सांगितला आहे. रणवीर आणि त्याच्या गर्लफ्रेंडला गोव्याच्या समुद्रकिनारी बुडता बुडता एका आयपीएस आणि आयआरएस जोडप्याने वाचवलं आहे. मृत्यूला हात लावून आलेल्या रणवीरने सविस्तर पोस्ट शेअर करत थोडक्यात बचावल्यानंतर आयुष्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
रणवीर सोबत काय घडलं गोव्यात?
गोव्यामध्ये रणवीर आपल्या गर्लफ्रेंड सोबत ख्रिस्मस सेलिब्रेशन साठी गेला होता. 24 डिसेंबरला संध्याकाळी 6 च्या सुमारास दोघेही समुद्रात पोहत होते. दोघंही स्विमर असल्याने ते पाण्यात निश्चिंत होते पण अचानक जोरदार लाट आली आणि काही कळायच्या आत त्यांच्या नाका-तोंडात पाणी गेलं. दरम्यान पाण्यात एकटं पोहणं सोप्प असतं पण अशावेळी दुसर्याला पाण्यातून खेचणं कठीण असल्याचं तो सांगतो. सुदैवाने त्याच्या आजूबाजूला एका कुटुंबाने त्यांना मदत केली आणि पाण्यातून बाहेर काढलं. हे जोडपं IPS officer आणि त्याची पत्नी IRS होती. नक्की वाचा: Goa Boat Incidence: गोव्यातील कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची बोट उलटली; एकाचा मृत्यू, 20 जणांना वाचवण्यात यश.
रणवीरची पोस्ट
रणवीरने या प्रकाराला "life-death barrier" म्हटलं आहे. दरम्यान त्याने याकाळात त्याच्यावर देवाची, येशूची कृपा असल्याचं म्हटलं. तसंच आपण काही कारणासाठीच वाचलो आहोत असं म्हणत जीवनाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. दरम्यान रणवीरने त्याच्या गर्लफ्रेंडची ओळख गुप्त ठेवली आहे.