रांची: जातीवरुन सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्ट केल्याने न्यायालयाने तरुणीला सुनावली कुराण वाटप करण्याची शिक्षा
रांची (Ranchi) येथे एका तरुणीने सोशल मीडियात जातीवरुन आक्षेपार्ह पोस्ट केल्याने न्यायालयाने तरुणीला शिक्षा सुनावली आहे.
रांची (Ranchi) येथे एका तरुणीने सोशल मीडियात जातीवरुन आक्षेपार्ह पोस्ट केल्याने न्यायालयाने तरुणीला शिक्षा सुनावली आहे. तर तरुणीला दिलेल्या शिक्षेनुसार तिला मुस्लिम धर्मियांचा पवित्र धर्मग्रंथ कुराण याचे वाटप करण्यास सांगितले आहे.तर कुराणच्या पाच प्रतींमधील एक प्रत अंजुमन इस्लामिया समिती आणि अन्य चार प्रती शाळा-कॉलेजांमधील ग्रंथालयात देण्याचा आदेश दिला आहे.
रिचा भारती (19) असे तरुणीचे नाव आहे. रिचा ही पहिल्या वर्षात शिकत असून तिने अल्पसंकख्यांच्या सामजाच्या भावना दुखावतील अशी पोस्ट सोशल मीडियात केली. यामुळे रिचा हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर अटक करण्यात आली होती. परंतु काही संघटनांनी तिची सुटका केली.(नोएडा: अर्धा तास कपडे पाहून ही खरेदी न करणाऱ्या ग्राहकाला विक्रेत्याने शिवीगाळ करत केली मारहाण, वाचा सविस्तर)
परंतु रिचा हिच्या वकिलांनी ती न्यायालयाच्या आदेशांचे पालन करणार असल्याचे म्हटले आहे. परंतु काही स्थानिक नेत्यांनी न्यायालयाच्या निर्णयावर नाराजगी व्यक्त केली आहे.