Former UP Governor Aziz Qureshi: उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल अजीज कुरैशी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ( UP Chief Minister Yogi Adityanath) यांच्याबाबत केलेल्या कथीत अपमानास्पद वक्तव्यावरुन ही एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेश (UP Police) राज्याचे माजी राज्यपाल अजीज कुरैशी ( Former UP Governor Aziz Qureshi) यांच्या विरोधात उत्तर प्रदेश पोलिसांनी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ( UP Chief Minister Yogi Adityanath) यांच्याबाबत केलेल्या कथीत अपमानास्पद वक्तव्यावरुन ही एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्यावरुन कुरैशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. उत्तर प्रदेश पोलिसांचे (UP police) म्हणने असे की, रामपूर जिल्ह्यातील सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये भाजप कार्यकर्ता आकाश सक्सेना (Aakash Saxena) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन कुरैशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दाखल केलेल्या एफआयआर नुसार, माजी राज्यपाल अजीज कुरैशी यांच्याविरोधा कलम 12 (अ), 153 (अ), 153 (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजीज कुरैशी यांच्यावर राष्ट्रद्रोह, दोन जाती, धर्म यांच्यात तणाव आणि वैमनस्य वाढविणे, जनतेमध्ये संभ्रम, दहशत पसरवणे असे आरोप आहेत. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 505 (1) ( ब) अन्वयेही गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी म्हटले आहे की, आकाश सक्सेना यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, कुरैशी हे मंत्री अजम खां यांच्या घरी त्यांची पत्नी आणि रामपूरचे विधायक तंजीम फातिमा यांना भेटण्यासाठी गेले होते. या वेळी त्यांनी योगी आदित्यनाथ यांची आणि त्यांच्या सरकारची तुलना 'सैतान आणि रक्त पिणाऱ्या राक्षसां'सोबत केली. पोलिसांनी म्हटले आहे की, सक्सेना यांनी आपल्या तक्रारीत म्हटले की, कुरैशी यांचे वादग्रस्त विधान दोन समूहांमध्ये तनाव निर्माण करणार आहे. त्यातून सांप्रदायिक भावाना दुखावल्या जाऊन प्रक्षोभ निर्माण होऊ शकतो. (हेही वाचा, UP Crime: उदार घेतलेले 60 रुपये परत मागितले म्हणून 13 वर्षीय मुलाने मित्राची केली हत्या)
एएनआय ट्विट
दरम्यान, रामपूरचे नेते आणि माजी मंत्री आजम खांहे काही सध्या विविध आरोपांखाली काराकृहात आहेत. मधल्या काळात त्यांना कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कुरैशी उत्तराखंड, मिझोराम आदी राज्यांचे राज्यपाल राहिले आहेत. त्यांच्या जवळ सन 2012 ते 2015 मध्ये उत्तर प्रदेशचा अतिरिक्त कारभारही होता. कुरैशी हे मध्य प्रदेशच्या सताना जिल्ह्यातून काँग्रेस खासदारही राहिले आहेत.