Ramdas Athawale Poem On Prime Minister Narendra Modi Video: रामदास आठवले यांची पंतप्रधान मोदी यांच्यावर कविता 'इसलिये 'वो' करते है मोदीजी से प्यार'
Ramdas Athawale Poem in Rajya Sabha | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले ( Ramdas Athawale) यांच्यातील कवी सर्वश्रुत आहे. संधी मिळाली की आपले कवीपण दाखवण्याची संधी ते एकदाही सोडत नाहीत. मग तो सर्वसामान्य कार्यकर्त्यांसोबतचा कार्यक्रम असो की भारताचे सर्वोच्च न्यायमंदिर संसद. कवी आठवले यांच्या कवितांना बहर चढतोच. अगदी माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी (Manohar Joshi), सोमनाथ चटर्जी (Somnath Chatterjee) यांच्यापासून अनेकांनी रामदास आठवले यांच्या कवितेची अनुभीती घेतली आहे. रामदास आठवले यांनी आजही लोकसभेत आपल्या काव्याची झलक दाखवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार (Santosh Kumar Gangwar) यांच्यावर स्थुतीसुमने उथळत एक स्थुतीकाव्यच ( Ramdas Athawale Poem On Prime Minister Narendra Mod) आठवले यांनी सभागृहात ऐकवले. कामगार कायदा विधेयकावर ते लोसभेत बोलत होते.

रामदास आठवले यांच्या कवितेला सभागृहातील इतर सदस्यांनीही जोरदार पाठिंबा दिला. रामदास आठवले यांनी उच्चारलेल्या कवितेच्या प्रत्येक वाक्याला वाह.. वाह... अशी प्रतिक्रिया आल्याने कवी आठवले अधिकच खुलले आणि त्या आनंदाच्या भरात यांनी जवळपास आपले संपूर्ण भाषण कवितेतच केले. (हेही वाचा, Lockdown: रामदास आठवले यांची नवी कविता, 'हम अभी हैं गंभीर मोड़ पर, क्यों आ रहे हो आप रोड पर')

कवी आठवले यांचे काव्यात्मक भाषण (व्हिडिओसह)

मजूरोंको न्याय मिलेगा... तो देश गतीसे आगे चलेगा

अब कंपनी का मालिक हिलेगा... और मजदूरोंको सही न्याय मिलेगा

मजदूरोंका लाडले नेता है.. नरेंद्र मोदी...

इसलिये उन्होने छिन ली है... काँग्रेस की सत्ता की गद्दी

बोल रही है गांव गाव की मजदूर दादी...

प्रधान मंत्री के रुप मे बहुतही अच्छे हैं नरेंद्र मोदी..

पंतप्रधान मोदी ने अपने कंदोपर लिया है मजदुरोंका भार..

इसलिये देश के मजदूर करते है मोदीजीसे प्यार

जीनको मजदुरोंका मिल राहा है बहोतही प्यार..

उनका नाम है संतोष गंगवार...

संतोष गंगवार जी आदमी है सोबर...

इसलिये उनको मिला है मनिस्ट्री ऑफ लेबर...

संतोष गंगवार में है हिंम्मत...

इसलिये हम उसको देते है किमत

रामदास आठवले कविता व्हिडिओ

रामदास आठवले यांची संसदेत काव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही त्यांनी आपल्या कवीतेची झलक अनेकदा दाखवली आहे. अर्थात या कविता किती गांभीर्याने घेतल्या जातात हा भाग निराळा. रामदास आठवले हे भाषण करत आहेत आणि कविता आली नाही असे शक्यतो होत नाही. आपल्या कवितेच्या माध्यमातून रामदास आठवले विरोधकांवर जोरदार प्रहार करतात. त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हाही त्यांनी वापरलेल्या काव्यात्मक ओळी चर्चेचा विषय ठरल्या होत्या.