रजनीकांत मिश्रा यांची CBI संचालक पदी नियुक्ती?

आता रजनीकांत मिश्रा यांना सीबीआयचे संचालक पदभार सांभळण्यासाठी नियुक्त करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

CBI (Photo Credits-Twitter)

सीबीआयचे (CBI) माजी संचालक आलोक वर्मा यांना अवघ्या 48 तासाच्या आतमध्ये पदावरुन हटविण्यात आले. तसेच मोदी सरकारचा सीबीआयमध्ये हस्तक्षेप आणि आरोप-प्रत्यारोपाच्या कारभारमुळे अखेर वर्मा यांनी राजीनामा (Alok Varma) देऊ केला होता. त्यानंतर आता रजनीकांत मिश्रा (Rajnikant Mishra) यांना सीबीआयचे संचालक पदभार सांभळण्यासाठी नियुक्त करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

शुक्रवारी नव्या सीबीआय संचालक पदाची एक विशेष बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी जावेद अहमद, रजनीकांत मिश्रा, एसएस देसवाल आणि शिवानंद झा यांच्या नावांची शिफारस करण्यात आली होती. तसेच सीबीआय पदाचा भार कोणाकडे द्यायाचा याबाबत मोदी यांच्या निवसास्थानी सरन्यायाधीश रंजन गोगई आणि काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे उपस्थित होते. तर गेल्या चार नावांवर खरगे हे समाधानी नसल्याने त्यांचा विरोध डावलत तीन नावे मंत्रिमंडळ समितीला देण्यात आली होती.(हेही वाचा-सीबीआय माजी संचालक आलोक वर्मा यांचा राजीनामा)

रजनीकांत मिश्रा हे 1984 बॅचचे IPS अधिकारी आहेत. तर 10 जानेवारी पासून सीबीआयचे संचालकपद रिक्त असल्याने अखेर रजनीकांत मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.