केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यंदा पॅरिस मध्ये करणार शस्त्रपूजा; दसर्‍याचा मुहूर्त साधत स्वीकारणार Rafale Aircraft

संरक्षण मंत्री (Defence Minister) राजनाथ सिंह (Rajnath Singh) हे येत्या दसऱ्याला (Dusshera 2019) म्हणजेच 8 ऑक्टोबर रोजी प्रतिवर्षीप्रमाणे शस्त्रपूजा (Weapons Worship) करणार असल्याचे समजत आहे, मात्र यंदा भारतात नव्हे तर पॅरिस (Paris) मध्ये ही पूजा पार पडणार आहे.

Rajnath Singh (ANI)

केंद्रीय संरक्षण मंत्री (Defence Minister) राजनाथ सिंह (Rajnath Singh) हे येत्या दसऱ्याला (Dusshera 2019) म्हणजेच 8 ऑक्टोबर रोजी प्रतिवर्षीप्रमाणे शस्त्रपूजा (Weapons Worship) करणार असल्याचे समजत आहे, मात्र यंदा भारतात नव्हे तर पॅरिस (Paris) मध्ये ही पूजा पार पडणार आहे. भारताची राफेल (Rafale) या लढाऊ विमानाची पहिली डिलिव्हरी स्वीकारण्यासाठी राजनाथ सिंह हे फ्रान्स दौरा करणार असून याच मुहूर्तावर ते शस्त्रपूजा देखील करणार आहेत. या दिवशीच भारतीय हवाईदल दिवसाचे सेलिब्रेशन (IAF Day) देखील पार पडणार आहे. हिंदू संस्कृतीनुसार दसऱ्याच्या दिवशी घरातील लक्ष्मी व शस्त्रांची पूजा करण्याची पद्धत आहे ज्याचे पालन करून दरवर्षी राजनाथ सिंह व पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राचीन व नवीन शस्त्रांची पूजा करतात.

प्राप्त माहितीनुसार, यापूर्वी राजनाथ सिंह हे गृहमंत्री म्हणून कार्यभार सांभाळत असताना दरवर्षी शस्त्रपूजा करत होते यंदा पहिल्यांदाच संरक्षण मंत्री म्हणून शस्त्रपूजा करणार आहेत. या निमित्ताने राजनाथ सिंह हे फ्रान्सचे पंतप्रधान इमॅन्युल मॅक्रोन यांची देखील भेट घेणार आहेत ज्यांनंतर बॉर्डेक्स येथे जाऊन राजनाथ  राफेल विमानाची डिलिव्हरी घेणार आहेत.(राफेल विमानाची जागा घेणार Dassault Aviation चं सर्वात शक्तीशाली नवं लढाऊ विमान; Airbus सोबत करार)

ANI ट्विट

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भारतीय हवाई दलाचे एअर चीफ मार्शल आर के एस. भादुरीया यांनी पाटकर परिषदेत माहिती देताना मे 2020 पर्यंत राफेलच्या 36 विमानांची डिलिव्हरी भारताकडे सुपूर्त करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे, तसेच भारतीय आकाश मार्गातून मे २०२० मध्येच पहिल्यांदा राफेल उड्डाण घेऊ शकते.