भारताच्या पहिल्या राजधानीला एक्सप्रेसला पूर्ण झाली 50 वर्ष, दिल्लीत झाले जंगी स्वागत

देशातील पहिली राजधानी एक्सप्रेसने (Rajdhani Express) 50 वर्ष पूर्ण झाली आहेत.या ट्रेनने यावर्षी रविवारी (3 मार्च) आपली गोल्डन जुबली (Golden Jubilee) पूर्ण केली आहे.

Kolkata Rajdhani Express (Photo Credits-Twitter)

देशातील पहिली राजधानी एक्सप्रेसने (Rajdhani Express) 50 वर्ष पूर्ण झाली आहेत.या ट्रेनने यावर्षी रविवारी (3 मार्च) आपली गोल्डन जुबली (Golden Jubilee) पूर्ण केली आहे. कोलकाता (Kolkata) राजधानी एक्सप्रेसने पहिल्यांदा 1969 मध्ये सुरु झाली होती. तर 2019 मध्ये या एक्सप्रेसने आपली 50 वर्ष पूर्ण केली आहेत. साठच्या दशकात गति आणि लग्जरी पद्धतीने भारतीय रेल्वेमध्ये क्रांती करणारी ही एक्सप्रेस ठरली आहे.

आपल्या सुवर्ण मोहत्सवी जयंतीच्या निमित्ताने फुलांनी सजवलेली ही ट्रेन हावडा स्टेशन येथून निघाली. एका माजी अधिकाऱ्याने असे सांगितले की, कोलकाता-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस 3 मार्च 1969 रोजी पहिली एक्सप्रेस हावडा येथून रवाना केली होती. ही देशातील प्रथम एअर कंडिशन, जलद गतिने धावणारी ही एक्सप्रेस 17 तास 20 मिनिटांत 1,450 किलोमीटर धावू शकते.

या ट्रेनचे स्वागत दिल्ली मध्ये आल्यावर केक कापून करण्यात आले. तसेच दिल्ली येथील रेल्वेस्थानकावरील लोकांनी फुलांचा वर्षाव करत या ट्रेनचे स्वागत केले.