Door-to-Door Vaccination: घरोघरी जावून लस देणारं 'हे' ठरलं देशातील पहिलं शहर

त्यानंतर विविध टप्प्यांमध्ये लसीकरण होत आहे. मात्र डोर-टू-डोर व्हॅक्सिनेशन म्हणजेच घरोघरी जावून लसीकरण देशात अद्याप सुरु झाले नव्हते. मात्र देशातील एका शहरात सोमवारपासून हे अभियान सुरु होणार आहे.

Vaccine | Representational Image | (Photo credits: Flickr)

जानेवारी 2021 पासून देशात कोविड-19 लसीकरण (Covid-19 Vaccination) मोहिमेला सुरुवात झाली. त्यानंतर विविध टप्प्यांमध्ये लसीकरण होत आहे. मात्र डोर-टू-डोर व्हॅक्सिनेशन (Door-to-Door Vaccination) म्हणजेच घरोघरी जावून लसीकरण देशात अद्याप सुरु झाले नव्हते. मात्र देशातील एका शहरात सोमवारपासून हे अभियान सुरु होणार आहे. 45 वर्षांवरी लोकांना लस देण्यासाठी हे अभियान असेल. राजस्थान (Rajasthan) मधील बिकानेर (Bikaner) शहरात डोर-टू-डोर व्हॅक्सिनेशन सुरु होणार आहे. घरोघरी जावून लस देणारं देशातील हे पहिलं शहर ठरलं आहे.

बिकानेर मध्ये या अभियानासाठी 2 अम्बुलन्स आणि 3 मोबाईल टीम्स तयार करण्यात आल्या आहेत. या शहरात घरोघरी जावून नागरिकांना लस देतील. त्याचबरोबर यासाठी राजस्थान सरकारने एक हेल्पलाईन नंबर सुरु केला आहे. या व्हॉट्सअॅप नंबरच्या माध्यमातून नागरिक आपले नाव, पत्ता देऊन कोविड-19 लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करु शकतात.

रिपोर्टनुसार, कमीत कमी 10 लोकांनी लसीसाठी रजिस्ट्रेशन केल्यानंतर व्हॅक्सिनेशन व्हॅन घरापर्यंत पोहचेल. लसी वाया जावू नयेत म्हणून ही अट लागू करण्यात आली आहे. कोविड-19 लसीच्या एका कुपीतून 10 लोकांना एक-एक डोस देता येईल. (COVID-19 Vaccination In India Revised Guidelines: भारत सरकार कडून 21 जून पासून सुरू होणार राष्ट्रीय कोविड लसीकरण कार्यक्रम; नवी नियमावली जारी)

बिकानेरचे जिल्हाधिकारी नमित मेहता यांनी सांगितले की, तज्ञांनी कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. 45 वर्षांवरील 75 टक्के लोकांचे लसीकरण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे घरोघरी जावून लस देण्याचे हे अभियान नक्कीच फायदेशीर ठरेल.

2011 च्या जनगणनेनुसार बिकानेर शहराची लोकसंख्या 7 लाखाहून अधिक होती आणि आतापर्यंत 369,000 लोकांचे लसीकरण झाले आहे, असे नमित मेहता यांनी सांगितले.

नमित मेहता पुढे म्हणाले की, 45 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रात जाण्यात अनेक समस्या असून शकतात. त्यामुळे घरोघरी लसीकरणासाठी अनेक लोकांनी सहमती दर्शवली आहे.