राजस्थान: धक्कादायक! चारित्र्याच्या संशयावरुन तरुणाने होणाऱ्या बायोकाला शेतात बोलावून तिची कुऱ्हाडीने केली हत्या
रिलेशनशिप मध्ये जर पार्टनरच्या बद्दल संशय निर्माण झाला असल्यास एकमेकांमध्ये फूट पडू लागते. दोघेएक वेगळे झाले तर ठिक आहे. मात्र दोघांपैकी एकाने जरी आपल्या भावनांना जागा दिली किंवा कोणतेही पाऊल उचलले तर त्याचे रुपांतर गुन्ह्यात होते.
राजस्थान: रिलेशनशिप मध्ये जर पार्टनरच्या बद्दल संशय निर्माण झाला असल्यास एकमेकांमध्ये फूट पडू लागते. दोघेएक वेगळे झाले तर ठिक आहे. मात्र दोघांपैकी एकाने जरी आपल्या भावनांना जागा दिली किंवा कोणतेही पाऊल उचलले तर त्याचे रुपांतर गुन्ह्यात होते. ज्याचे परिणाम अत्यंत गंभीर होतात. अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना राजस्थान मधील नारौर येथून समोर आली आहे. जेथे एका तरुणाने आपल्या होणाऱ्या बायकोवर असलेल्या संशयावरुन तिची हत्या केली आहे. रिपोर्ट्सनुसार, तरुणाला आपल्या होणाऱ्या बायोकोच्या चारित्र्यावर संशय होता. या व्यतिरिक्त दोघांमध्ये काही कारणावरुन वाद सुद्धा व्हायचे. या दरम्यान तरुणाने आपल्या होणाऱ्या बायकोला भेटण्याचे ठरवले. तिला भेटण्यासाठी शेताजवळ बोलावले.
तरुणी जशी त्याला भेटण्यासाठी शेताजवळ आली त्यावेळी धक्कादायक घटना घडली. तरुणाने होणाऱ्या बायकोवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला. यामुळे तरुणीचा मृत्यू झाला. घडलेली घटना कोणाला कळू नये म्हणून त्याने तरुणीचा मृतदेह शेतातील एका झाडाजवळ लपवून तेथून पळ काढला. दुसऱ्या दिवशी साडोकन गावात जवळजवळ 12 वाजता तरुणीचा मृतदेह आढळून आल्याची गोष्ट सर्वत्र पसरली गेली.(UP Rape Shocker: पन्नास वर्षीय महिलेची सामूहिक बलात्कारानंतर हत्या, गुप्तांगासह शरीरावर असंख्य जखमा; अवयव तुटल्याचाही शवविच्छेदन अहवालात खुलासा)
दरम्यान, स्थानिक लोकांनी घटनेची पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास करण्यास सुरु केली असता लोकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तर तरुणीच्या नातेवाईकांनी आरोपीला अटक करण्यासह त्याला शिक्षा द्यावी अशी मागणी केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याने सुद्धा आपला गुन्हा मान्य केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 08, 2021 04:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

