मृत व्यक्तीचा आत्मा घेऊन जाण्यासाठी तांत्रिकाकडून रुग्णालयात पूजा

तसेच अपघात झाल्यानंतर त्याला रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले होते.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फेसबुक)

राजस्थान (Rajasthan) येथील रुग्णालयात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच अपघात झाल्यानंतर त्याला रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले होते.मात्र काही दिवसानंतर मृत व्यक्तीच्या घरातील मंडळी त्याचा आत्मा घेऊन जाण्यासाठी चक्क रुग्णालयात पोहचले असल्याचा विचित्र प्रकार घडला आहे.

मृत व्यक्तीच्या घरातील मंडळींनी एका तांत्रिकाच्या मदतीने रुग्णालयात जाऊन पूजा केली. तर घरातील मंडळींना त्यांच्या मृत मुलाचा आत्मा परत मिळवण्यासाठी हा सर्व प्रकार केल्याचे सत्य समोर आले आहे. टीओआयच्या वृत्तानुसार, बरोडा गावातील लोकांनी रुग्णालयाच्या पुरुष वॉर्ड बाहेर हवन केले होते. मात्र हवन करताना या मंडळींना रुग्णालयातील कोणत्याही व्यक्तीने अडवले नाही.

तर एका नातेवाईकाचे असे म्हणणे होते की, आम्ही मृत मुलाचे शरीर अंतिम संस्कार करण्यासाठी घेऊन गेलो होतो. मात्र त्याचा आत्मा अद्याप या रुग्णालयातच आहे. त्यामुळे तांत्रिकाकडून पूजा करुन घेतल्यावर आत्मा आम्हाला परत मिळाल्यानंतर त्याला घराच्या एका कोपऱ्यात ठेवणार असल्याचे त्याने सांगितले. तसेच काळ्या जादू पासून येथील लोक प्रचंड घाबरस असल्याने या मंडळींना कोणाही रोकले नसल्याचे एका वॉर्ड बॉयने सांगितले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif