Rajasthan Suicide Case: राजस्थान मध्ये 21 वर्षीय मुलीने 6 व्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य; सुसाईड नोट हातावर
सध्या राजस्थानच्या कोट्यामध्ये अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी दाखल होतात पण परीक्षा आणि स्पर्धेचा ताण सहन न झाल्याने आत्माहत्येसारखे टोकाचे पाऊक उचलत आहेत.
राजस्थान (Rajasthan) मध्ये 21 वर्षीय मेडिकलच्या विद्यार्थिनीने आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं आहे. ही विद्यार्थीनी Dungarpur Medical college ची आहे. कॉलेजच्या हॉस्टेल बिल्डिंगच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून तिने आपलं आयुष्य संपवलं आहे. या मुलीचं नाव Sudhanshi Singh आहे. तिच्या हातावर सुसाईड नोट लिहलेली आढळलेली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भरतपूर येथील रहिवासी असलेली ही मुलगी वसतिगृहाच्या खोलीत एकटीच राहत होती. वसतिगृहातील काही मुलींनी तिला जनरल बाथरूममध्ये जाताना पाहिले आणि काही वेळातच तिने खोलीच्या बाल्कनीतून खाली उडी मारली.
आवाज ऐकून वसतिगृहात राहणाऱ्या इतर मुली घटनास्थळी पोहोचल्या. उंचावरून पडल्यानंतर तिच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनीला तात्काळ डुंगरपूर रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. माहिती मिळताच डुंगरपूरचे एसपी कुंदन कंवारिया, सुरेंद्र सोलंकी सीआय कोतवाली आणि मदनलाल एसएचओ बिछीवाडा पोलिस स्टेशनही हॉस्पिटलमध्ये पोहोचले.
आत्महत्येचे पाऊल टाकण्यापूर्वी सुधाशीने तिच्या तळहातावर लिहिले, “आतापासून मी कोणतीही चूक करणार नाही, माझे वचन आहे. आई, बाबा, भाऊ आणि रोहित माफ करा." सुधाशीचा मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला असून कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे. पोलीस वसतिगृहातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांकडून माहिती गोळा करत आहेत. तिचे कुटुंबीय भरतपूरहून आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण समजू शकेल. मुलीचे वडील एका खासगी शाळेत शिक्षक आहेत.
सध्या राजस्थानच्या कोट्यामध्ये अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी दाखल होतात पण परीक्षा आणि स्पर्धेचा ताण सहन न झाल्याने आत्माहत्येसारखे टोकाचे पाऊक उचलत आहेत.