Rajasthan Shocker: अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; कोळशाच्या भट्टीत जिवंत जाळल्याचा आरोप, तीन जणांना अटक
याबाबत काही सुगावाही सापडला आहे. मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र शवविच्छेदनानंतरच याची पुष्टी होईल.
राजस्थानमधील (Rajasthan) भीलवाडा जिल्ह्यातील कोत्री पोलीस स्टेशन परिसरात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) करून तिला तिला जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही मुलगी बुधवारपासून बेपत्ता होती. त्यानंतर आता तिच्यावर बलात्कार करून तिला भट्टीत जाळण्यात आल्याची माहिती मिळत आहे. जवळच्या जंगलात कोळशाच्या भट्टीबाहेर मुलीच्या बांगड्या आणि चप्पल सापडल्या.
ग्रामस्थांनी अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिची हत्या झाल्याचा संशय कोटरी पोलीस ठाण्यात व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. प्राथमिक तपासात तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बलात्कारानंतरच तिला भट्टीत जाळले गेले असावे, असे सांगितले जात आहे. याप्रकरणी आतापर्यंत 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
भीलवाडा येथील या खळबळजनक घटनेनंतर कोत्री पोलीस ठाण्याचे प्रभारी अतिरिक्त एसपी घटनास्थळी पोहोचले आहेत. एफएसएल टीम आणि श्वान पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. याप्रकरणी स्टेशन प्रभारी खिनराज गुर्जर यांनी सांगितले की, नरसिंहपुरा गावातील एक अल्पवयीन मुलगी बुधवारी सकाळी तिच्या आईसोबत शेतात बकर्या चरायला गेली होती. दुपारी तिची आई घरी परतली मात्र मुलगी बेपत्ता होती. गावात मुलीचा शोध घेण्यात आला. मात्र गावात ती न सापडल्याने जंगलात शोध सुरू केला. त्यावेळी तिथल्या एका कोळशाच्या भट्टीतून धूर निघत असल्याचे दिसून आले. नातेवाइकांनी तेथे शोध घेतला असता, चुलीच्या बाहेर मुलीच्या बांगड्या आणि चप्पल आढळून आली. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. (हेही वाचा: Karnataka: अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार, पाच जणांवर POCSO Act अन्वये गुन्हा दाखल)
भिलवाडा एसपी आदर्श सिद्धू यांनी सांगितले की, मुलीची हत्या आणि तिला जाळल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत काही सुगावाही सापडला आहे. मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र शवविच्छेदनानंतरच याची पुष्टी होईल. चारपैकी तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.