Rajasthan Shocker: भीलवाडामध्ये विद्यार्थिनीच्या बाटलीत भरली लघवी; गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट, सुरु झाली जोरदार हाणामारी व निदर्शने (Watch)

माहितीनुसार, भिलवाडा येथील लुहरिया गावातील सरकारी माध्यमिक विद्यालयात इयत्ता 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या पिण्याच्या बाटलीत एका समाजाच्या मुलाने लघवी भरून एक चिट्ठी ठेवली, ज्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Rajasthan Clash Video (संग्रहित संपादित प्रतिमा)

राजस्थानच्या (Rajasthan) भीलवाडामध्ये (Bhilwara) मोठा गोंधळ झाल्याची बातमी आहे. येथे एका शाळकरी मुलीशी गैरवर्तन करण्यात आले. एवढेच नाही तर मुलीच्या सोबतच्या विद्यार्थिनीने तिच्या पाण्याच्या बाटलीत लघवी मिसळल्याचा आरोपही केला आहे. या गैरवर्तनानंतर भिलवाडामध्ये लोकांनी प्रचंड गदारोळ केला. लोक रस्त्यावर आले आणि गोंधळ घालू लागले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. वाढता गोंधळ पाहून पोलिसांनी लोकांना नियंत्रित करण्यासाठी लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली.

माहितीनुसार, भिलवाडा येथील लुहरिया गावातील सरकारी माध्यमिक विद्यालयात इयत्ता 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या पिण्याच्या बाटलीत एका समाजाच्या मुलाने लघवी भरून एक चिट्ठी ठेवली, ज्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. लुहारियाच्या शासकीय शाळेला टाळे ठोकण्यात आले असून कारवाईच्या मागणीसह शाळेतील कर्मचाऱ्यांचे स्थलांतर व विद्यार्थ्याला बाहेर काढण्याच्या मागणीवर ग्रामस्थ ठाम राहिले.

त्याचवेळी काही ग्रामस्थ हातात लाठ्या घेऊन आले, त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक घनश्याम शर्मा यांनी सांगितले की, शुक्रवारी लुहारिया गावातील सरकारी वरिष्ठ उच्च माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने तक्रार केली की, ती जेवणासाठी घरी गेली होती. दप्तर शाळेतच सोडले होते. काही मुलांनी पिशवीत ठेवलेल्या पाण्याच्या बाटलीत लघवी मिसळली. ते प्यायल्यानंतर दुर्गंधी येऊ लागल्याने तिने याबाबत तक्रार केली. तिच्या बॅगेत एक प्रेमपत्रही ठेवले होते, ज्यामध्ये ‘आय लव्ह यू’ असे लिहिले होते. (हेही वाचा: Rajasthan Shocker: राजस्थानमध्ये अल्पवयीन बहिणींवर सामुहिक बलात्कार; दोघी गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, गुन्हा दाखल)

शर्मा यांनी पुढे सांगितले की, विद्यार्थिनीच्या तक्रारीवर शाळेच्या मुख्याध्यापकांनी कोणतीही कारवाई केली नाही. यावरून सोमवारी शाळा सुरू झाल्यावर संतप्त झालेल्या लोकांनी तहसीलदार, लुहारिया पोलीस ठाण्याचे प्रभारी व शाळेच्या मुख्याध्यापकांकडे तक्रार केली. मात्र तरीही कोणतीही प्रभावी कारवाई होताना दिसत नसल्याने ग्रामस्थांनी विशिष्ट समाजाच्या वस्तीत घुसून दगडफेक केली. विद्यार्थिनीच्या वतीने अद्याप पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. सहादा अतिरिक्त एसपी प्रकरण सांभाळत असून, सल्लामसलत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.