PUBG गेमच्या नादात मुलाने घरातील तिजोरी केली खाली, तब्बल 3 लाखांची रोकड लंपास
खरंतर मुलाने ही रक्कम पबजी खेळासाठी चोरल्याचे समोर आले आहे.
Rajasthan: मोबाईलवर गेम खेळण्याच्या नादात एका मुलाने चक्क 3 लाखांची रोकड लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. खरंतर मुलाने ही रक्कम पबजी खेळासाठी चोरल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुलाच्या शेजाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.(Uttar Pradesh: कॉलेजमध्ये शिरलेल्या बिबट्याचा विद्यार्थ्यावर हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद Watch Video)
झालावाडा शहरातील एक मुलगा पबजी गेम खेळण्यात ऐवढा वेडा झाला की त्याने घरातील तिजोरी खाली केली. अल्पवयीन मुलाने गेम खेळून 3 लाख रुपये उडवले. त्याच्या नातेवाईकांनी असे म्हटले की, त्याला या गेम खेळण्याच्या सवयीचा फायदा त्यांच्या शेजारील ई-मित्र दुकान चालवणाऱ्या तरुणाने घेतला आहे. त्याने अल्पवयीन मुलाला घरातून पैसे घेऊन येण्यास मजबूर करत होता. त्याचसोबत स्वत:च्या रेफरल कोडचा वापर करत इक्विपमेंट्स खरेदी करत होता. पैसे घेऊन न गेल्यास दुसऱ्या दिवशी दुप्पट पैसे द्यावे लागतील अशी धमकी सुद्धा त्याने दिली होती. यामुळे नातेवाईकांनी पोलिसात धाव घेतली आहे.
अल्पवयीन मुलाने आपल्या मामाला सांगितले की, त्याच्या शेजारील तरुणाने 21 जूनला आपल्याकडे बोलावले. तेव्हाच त्याला आपल्या बाजूने करत पबजी इक्विपमेंट्स खरेदी करण्याबद्दल सांगितसे. त्याचसोबत त्याच्या वडीलांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल आणि बँक खात्याची माहिती सुद्धा त्या मित्राने मागितली.
आरोपीने अल्पवयीन मुलाच्या वडीलांच्या अकाउंटच्या नावे पेटीएम खाते सुरु केले. त्यामध्ये नवा मोबाईल क्रमांक सुद्धा टाकला. आरोपीने पहिल्यांदा मुलाकडून 500 रुपयांचे ट्रांजेक्शन केले. त्यानंतर सातत्याने आपल्या जाळ्यात अडकवत मुलाकडून पैसे घेत त्याने बंदूक, कपडे आणि अन्य इक्विपमेंट्स खरेदी केले.
पैसे आणले नाही तर त्याला तो धमकावत असे. हा सर्व प्रकार गेल्या 6 महिन्यांपासून सुरु होता आणि अशाप्रकारने त्याने 3 लाख रुपये लुबाडले. परंतु मुलगा जेव्हा चिडचिड आणि उदास राहू लागला असता त्याला नातेवाईकांनी विचारले. तेव्हा त्याने सत्य सर्वांना सांगितले. आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच त्याच्यावर कठोर कारवाई अशी ही मागणी अल्पवयीन मुलाच्या नातेवाईकांनी केली आहे. कारण त्याने अशाच प्रकारे अन्य मुलांकडून सुद्धा पैसे उकळले आहेत.