Dead Body Breathes At Jhunjhunu: मृतदेहाने घेतला श्वास; मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यासह चार डॉक्टर निलंबीत; राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील घटना
त्याचे शवविच्छेदनही झाले. अंत्यसंस्कार करताना सदर व्यक्ती हालचाल करु लागल्याने आणि जीवंत असल्याचे लक्षात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात चाल डॉक्टर निलंबीत झाले आहेत.
Man Declared Dead Alive: राजस्थान राज्यातील (Rajasthan News) झुंझुनू (Jhunjhunu) जिल्ह्यात अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. या जिल्ह्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करुन त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदनही करण्यात आले. इतरे सगळे सोपस्कर पार पडल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्याला चितेवर ठेवण्यात आले. नेमके त्याच वेळी त्याने हालचाल केली आणि तो श्वासही घेत असल्याचे लक्षात आली. ज्यामुळे एकच खळबळ उडाली. वैद्यकीय निष्काळजीपणा (Medical Negligence) असल्याच्या या प्रकरणाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली. इतकेच नव्हे तर मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यासह चार डॉक्टरांना निलंबित (Suspended Doctors) करण्यात आले. या घटनेमुळे वैद्यकीय निष्काळजीपणाबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली आहे.
काय घडले नेमके?
राजस्थान राज्यातील रोहिताश नावाचा 25 वर्षीय व्यक्तीस प्रकृतीसंबंधी काही समस्या निर्माण झाल्या. ज्यामुळे त्याला झुंझुनूच्या बीडीके रुग्णालयात गुरुवारी (21 नोव्हेंबर) दाखल करण्यात आले. रोहिताश हा बहिरा आणि मुका आहे. त्यातच तो अनाथ असल्याने अनाथाश्रमात राहात असे. प्रकृतीसंबंधी बिघाड झाल्याने त्याच्या हालचाली बंद झाल्या होत्या. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय निष्काळजीपणा दाखवत डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. इतकेच नव्हे तर त्याच्या मृतदेहाचे कथीतरित्या शवविच्छेदनही करण्यात आले. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, डॉक्टरांनी त्यास दुपारी 2.00 वाजता मृत घोषीत केले. त्यानंतर त्याला अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेण्यापूर्वी त्याचा मृतदेह शवागरात नेण्यात आला. तोपर्यंत त्याच्या अंत्यविधीचीही तयारी करण्यात आली. (हेही वाचा, Medical Negligence in Thane: ठाण्यात गंभीर वैद्यकीय निष्काळजीपणा; 9 वर्षांच्या जखमी मुलाच्या पायाऐवजी केली प्रायव्हेट पार्ट्सवर केली शस्त्रक्रिया, पालकांचा आरोप)
स्मशानभूमीत पुनर्जन्म
स्शनाभूमीत नेल्यावर रोहिताश याचा मृतदेह चितेवर ठेवण्यात आला. पण, चिता पेटविण्यापूर्वी उपस्थितांना जोरदार धक्का बसला. कारण, रोहिताश चक्क श्वास घेत होता आणि हालचालही करत होता. त्यामुळे तातडीने रुग्णवाहिका बोलावण्यात आली आणि त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले. सध्या त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. (हेही वाचा, Child Swap Nashik: नाशिक येथे बालकांची आदलाबदल, मुलीचा शस्त्रक्रियेनंतर मृत्यू)
जिल्हा प्रशासनाची त्वरित कारवाई
रोहिताशला मृत घोषित करण्यासाठी जबाबदार असलेल्या मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि इतर तीन डॉक्टरांना तातडीने निलंबीत करण्यात आले आरे. जिल्हाधिकारी रामावतार मीना यांनी या प्रकरणात तातडीने दखल घेतलली आहे. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये डॉ. योगेश जाखड, डॉ. नवनीत मील आणि डॉ. संदीप पाचर यांचा समावेश आहे. (हेही वाचा, Medical Negligence: डॉक्टरांकडून चुकीचे इंजेक्शन; महिलेचा मृत्यू; केरळ राज्यातील घटना)
दरम्यान, या वैद्यकीय निष्काळजीपणाची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी सामाजिक न्याय विभागाचे उपसंचालक पवन पूनिया आणि तहसीलदार महेंद्र मुंड यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक बोलावली. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्यात आली असून, निलंबित प्रधान वैद्यकीय अधिकाऱ्याकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे. वैद्यकीय विभागाच्या सचिवांनाही या घटनेची माहिती देण्यात आली असून पुढील कारवाई तपासाचे निष्कर्ष प्रलंबित आहेत, असे सांगण्यात आले आहे.