Rajasthan Chief Minister Candidate: राजस्थान भाजपामध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? वसुंधरा राजे अजूनही दावेदार?

राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून वसुंधरा राजे यांच्याव्यतिरिक्त केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत (Gajendra Shekhawat), सतीश पुनिया (Satish Poonia), राज्य भाजप प्रमुख सीपी जोशी (CP Joshi), दिया कुमारी (Diya Kumari सुश्री राजे यांची भाची) आणि राज्याचे 'योगी' बाबा बालक नाथ यांचा यांचीही नावे चर्चेत आहेत.

Vasundhara Raje | (Photo Credit: X)

Vasundhara Raje News: भारतीय जनता पक्ष राजस्थानमध्ये बहुमताने सत्तेत येताना दिसतो आहे. अशा वेळी राजस्थान भाजपमध्ये मुख्यमंत्री पदाचा (Rajasthan Chief Minister Candidate) दावेदार कोण, याबाबत उत्सुकता आहे. खास करुन माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान भाजप नेत्या वसुंधरा राजे यांच्या चेहऱ्याबाबत अनेकांनी चर्चा सुरु केली आहे. राजकीय गोटातील चर्चेनुसार वसुंधरा राजे अद्याप तरी मौन बाळगून असल्या तरी त्या सीएम पदाच्या प्रबळ दावेदार आहेत.

वसुंधरा यांना पर्याय कोण?

दरम्यान, वसुंधरा यांच्याव्यतिरिक्त केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत (Gajendra Shekhawat), सतीश पुनिया (Satish Poonia), राज्य भाजप प्रमुख सीपी जोशी (CP Joshi), दिया कुमारी (Diya Kumari सुश्री राजे यांची भाची) आणि राज्याचे 'योगी' बाबा बालक नाथ यांचा यांचीही नावे चर्चेत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. दरम्यान, सीपी जोशी आणि सतीश पुनिया यांना पराभवाचा सामना करावा लागल्याने निवडणुकीच्या निकालांमुळे ही यादी कमी होईल असा अंदाज आहे.

Vasundhara Raje | (Photo Credit: X)

राजेंभोवती अनिश्चितता:

झालरापाटनमधून सलग पाचव्या विजयानंतरही वसुंधरा राजे त्यांच्या राजकीय भवितव्याबद्दल गूढ कायम आहे. या निवडणुकीमध्ये वसुंधरा राजे यांची भूमिका अतिशय महत्त्वाची राहिली आहे. ज्यामुळे भाजपला सत्तासोपान चढता आला आहे. असे असले तरी, अद्याप तरी त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत जाहीर कोणतीही भूमिका घेतली नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दलचे गूढ वाढले आहे. (हेही वाचा, Ajit Pawar on BJP's Victory: नरेंद्र मोदी यांच्याशिवाय देशाला पर्याय नाही, अजित पवार यांची स्तुतीसुमने)

Vasundhara Raje | (Photo Credit: X)

नेतृत्वाचे कौतुक, जनतेच आभार

राजस्थानमधील विजयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना राजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाचे तत्वज्ञान, अमित शहा यांची रणनीती आणि जेपी नड्डा यांच्या नेतृत्वाला श्रेय दिले. त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे आणि मतदारांच्या आशीर्वादाचे कौतुक केले. जनतेने भाजपला सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानले. (हेही वाचा, Rajasthan Assembly Election Results 2023: राजस्थानमध्ये भाजप आघाडीवर, काँग्रेसची पिछेहाट; जाणून घ्या मतमोजणीचा प्राथमिक अंदाज)

Vasundhara Raje | (Photo Credit: X)

पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाची भूमिका:

राजस्थानमधील भाजपचे नेते सर्वोच्च पदाबाबतच्या प्रश्नांकडे सध्यातरी दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळते आहे. त्यामुळे दिया कुमारी आणि इतरही काही नेत्यांची नावे जारदोर चर्चेत येताना दिसतात. दरम्यान, राजस्थान भाजपमध्ये स्वत:ची ताकद निर्माण केलेल्या नेत्याने मौन बाळगल्याने केंद्रीय नेतृत्वाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

निवडणूक निकालांवर कटाक्ष:

अद्यापपर्यंत तरी स्पष्ट निकाल हाती आले नाहीत. त्यामुळे केवळ हाती आलेल्या प्राथमिक कलांच्या अनुशंघानेच विचार कारावा लागतो. दुपारी 3:30 वाजेपर्यंत, भाजप राज्याच्या 119 पैकी 115 जागांवर आघाडीवर आहे, ज्याने 101 चा अर्धा टप्पा आरामात ओलांडला आहे. पक्षाला 2018 च्या स्कोअरच्या तुलनेत 43 जागा मिळाल्या आहेत. याउलट, अवघ्या 69 जागांसह पिछाडीवर पडलेल्या काँग्रेसला 31 जागांनी घसरण झाली आहे. भाजपच्या निर्णायक आघाडीमुळे राजस्थानमध्ये महत्त्वपूर्ण राजकीय बदल घडणार आहेत हे मात्र निश्चित.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now