राजस्थान: बेरोजगार तरुणांना 1 मार्चपासून मासिक भत्ता मिळणार- अशोक गेहलोत
बेरोजगारांना मासिक भत्ता देण्याचा मोठा निर्णय राजस्थान सरकारने घेतला आहे.
बेरोजगारांना मासिक भत्ता देण्याचा मोठा निर्णय राजस्थान सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी राजस्थान विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटना कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी यासंदर्भातील घोषणा केली. यात बेरोजगार मुलांना तीन हजार तर मुलींना साडेतीन हजार रुपये भत्ता देण्यात येणार आहे.
राजस्थानमधील शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांची कर्जमाफी दिल्यानंतर आता बेरोजगार तरुणांना भत्ता देण्याचा निर्णय राजस्थान सरकारने घेतला आहे. हा भत्ता 1 मार्चपासून सुरु करण्यात येणार आहे.
2019 च्या निवडणूकीत काँग्रेस सत्तेत आल्यास सरकार किमान उत्पन्नाची हमी देईल, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे दिसतेय.