Raja Pateria Controversial Statement: ‘संविधान वाचवण्यासाठी पंतप्रधानांना मारा’; काँग्रेस नेते राजा पटेरिया यांचे वादग्रस्त विधान
लागलीच स्पष्टीकरण देत त्यांनी म्हटले की, 'आपल्या विधानात आलेला मारणे म्हणजे निवडणुकीत पराभव करणे अशा अर्थाने आला आहे'
Congress Leader Controversial Statement: मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्यातील काँग्रेस (Congress ) नेते राजा पटेरिया यांच्या एका विधानामुळे चांगलाच वाद निर्माण झाला आहे. एका भाषणादरम्यान, बोलताना राजा पटेरिया (Raja Pateria Controversial Statement) यांनी 'देशाचे संविधान वाचवायचे असेल तर पंतप्रधानांना (नरेंद्र मोदी) मारायला हवे.' आपण काय बोललो हे लक्षात येताच राजा पटेरिया यांनी आपलीबाजूही सावरली. लागलीच स्पष्टीकरण देत त्यांनी म्हटले की, 'आपल्या विधानात आलेला मारणे म्हणजे निवडणुकीत पराभव करणे अशा अर्थाने आला आहे'. पटेरियायांनी स्पष्टीकरण दिले असले तरी त्याचा फारसा प्रभाव दिसत नाही.
प्रारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 'पटेरिया यांनी आपल्या भाषणात म्हटले की, "पंतप्रधान मोदी निवडणुका संपवतील, मोदी धर्म, जात, भाषेच्या आधारावर फूट पाडतील. भविष्यात दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांचे जीवन धोक्यात आहे. संविधान वाचवायचे असेल तर मोदींना मारायला तयार व्हा'. पटेरिया हे पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. याच भाषणात परेटिया पुढे सांगतात की, आपल्या भाषणातील "हत्या" या शब्दाचा अर्थ पराभव होतो. ते म्हणाले की आपण महात्मा गांधींच्या अहिंसेच्या विचारसरणीचे पालन करतो. त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा अर्थ असा होता की अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी पंतप्रधान मोदींना निवडणुकीत पराभूत करणे आवश्यक आहे. (हेही वाचा, PM Narendra Modi Enjoys Dhol Vadan: महाराष्ट्र समृद्धी महामार्ग लोकार्पण सोहळ्यात नरेंद्र मोदी यांनाही पडली ढोल वादनाची भुरळ (Watch Video))
राहुल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा' सध्या मध्यप्रदेशातूनच जात आहे. त्यामुळे भाजपनेही जोरदार रान उठवले असून, काँग्रेस नेत्यांना प्रत्युत्तर देणे भाग पडत आहे. दरम्यान, मध्य प्रदेश सरकारने माजी राज्यमंत्री पटेरिया यांच्याविरुद्ध पोलिस खटला दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. एका केंद्रीय मंत्र्याने याला ‘अक्षम्य गुन्हा’ म्हटले आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला असून एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, "भारत जोडो यात्रा करण्याचे नाटक करणाऱ्यांचा खरा चेहरा समोर येत आहे."
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही पटेरिया यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. "अशा विधानांवरून दिसून येते की आजची काँग्रेस महात्मा गांधींची काँग्रेस नाही. इटलीची काँग्रेस ही मुसोलिनी मानसिकतेने ग्रस्त आहे," असेही मिश्रा यांनी म्हटले आहे.