Summer Special Trains: उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा, मुंबई ते गोरखपुर-दानापुर दरम्यान अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या

ट्रेन क्रमांक 01084 उन्हाळी विशेष गाडी सोमवारी 22 एप्रिल 2024 रोजी दुपारी 3.30 वाजता गोरखपुर येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी रात्री 12.25 वाजता पोहोचेल

Summer Special Trains: उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा, मुंबई ते गोरखपुर-दानापुर दरम्यान अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या
Train | (Photo Credits: X)

मुंबईतून उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईतून उत्तरेकडे जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई-गोरखपुर आणि मुंबई-दानापुर दरम्यान अतिरिक्त उन्हाळी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेन क्रमांक 01083 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपुर विशेष ट्रेन शनिवारी 20 एप्रिल 2024 रोजी रात्री 11:50 वाजता एलटीटी येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी 09:30 वाजता गोरखपुर येथे पोहोचेल. (हेही वाचा - Viral Video: सीट न मिळाल्याने ट्रेनच्या खिडकीच्या काचा फोडल्या, व्हिडिओ व्हायरल)

ट्रेन क्रमांक 01084 उन्हाळी विशेष गाडी सोमवारी 22 एप्रिल 2024 रोजी दुपारी 3.30 वाजता गोरखपुर येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी रात्री 12.25 वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक 01085 विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई रविवारी 21 एप्रिल 2024 रोजी रात्री 11:50 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी 9:30 वाजता गोरखपुर येथे पोहोचेल.

ट्रेन क्रमांक ०१०८६ विशेष गाडी मंगळवारी २३ एप्रिल २०२४ रोजी दुपारी ३.३० वाजता गोरखपुर येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी रात्री 12.25 वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक 01081 एलटीटी -दानापुर विशेष गाडी रविवारी 21 एप्रिल 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता दानापुर येथे पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 01082 विशेष गाडी सोमवारी 22 एप्रिल 2024 रोजी रात्री 8 वाजता दानापुर येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे 4.50 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल. या तिन्ही गाड्यांचे आरक्षण 19 एप्रिल 2024 रोजी भारतीय रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरु होणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Apr 19, 2024 07:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).