Raichur School Bus Accident: रायचूरमध्ये सरकारी बसची शाळेच्या बसला धडक; 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू, अनेक जण जखमी
पोलीस आणि स्थानिक रहिवाशांच्या मदतीने 15 जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Raichur School Bus Accident: कर्नाटक (Karnataka) च्या रायचूर (Raichur) येथे गुरुवारी कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ (KSRTC) च्या बसची शाळेच्या बस (School Bus) ला समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात (Accident) दोन विद्यार्थी ठार झाले असून अनेक जण जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस लोयोला शाळेच्या (Loyola School) विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना हा अपघात झाला.
प्राप्त माहितीनुसार, KSRTC बस, विरुद्ध दिशेने वेगाने प्रवास करत असताना खड्डा टाळण्यासाठी उलटली आणि थेट स्कूल बसवर आदळली. पोलीस आणि स्थानिक रहिवाशांच्या मदतीने 15 जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, केएसआरटीसी बसचालकाविरुद्ध मानवी पोलिस ठाण्यात (Manvi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा -Tamilnadu Road Accident: तामिळनाडूत नियंत्रण सुटल्याने कार आणि ट्रकची धडक, 4 मित्रांचा जागीच मृत्यू)
रायचूरमध्ये सरकारी बसची शाळेच्या बसला धडक, पहा अपघात स्थळावरील व्हिडिओ -
बेंगळुरूमधील बस अपघात -
गेल्या महिन्यात, बंगळुरूमध्ये एक मोठा अपघात झाला होता. एका बस चालकाचे व्होल्वो बसवरील नियंत्रण सुटले आणि बसची हेब्बल उड्डाणपुलाजवळ अनेक वाहनांची धडक बसली. या घटनेत किमान दोन जण गंभीर जखमी झाले होते. बसच्या सीसीटीव्हीमध्ये हा संपूर्ण अपघात कैद झाला होता. या व्हिडिओमध्ये ड्रायव्हर सुरुवातीला एका हाताने स्टेअरिंग चालताना दिसतो. ट्रॅफिक जवळ येताच त्याने ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला परंतु, बस थांबण्याऐवजी किमान चार कार आणि पाच दुचाकींना धडकली. (हेही वाचा -Malad Car Accident: मालाड मध्ये 27 वर्षीय महिलेचा भरधाव गाडीच्या धडकेत मृत्यू)
बेंगळुरूमधील बस अपघाताचा व्हिडिओ -
अखेरीस बस एका कारला आदळल्यानंतर थांबली. ब्रेक का लावला नाही, असा सवाल करत बस कंडक्टर ड्रायव्हरच्या सीटकडे धावत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. धडकेदरम्यान बसच्या विंडशील्डचा चक्काचूर झाला. तसेच बसने ज्या वाहनांना धडक दिली होती, त्या वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे.