Rahul Gandhi's Disqualification as MP: राहुल गांधी यांची आज दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद

काँग्रेसच्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन ही माहिती देण्यात आली आहे.

Rahul Gandhi | (Photo Credits: Twitter)

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ‘मोदी’ आडनावावरून (Modi Surname) केलेल्या टिप्पणीवरून सुरत न्यायालयाने (Surat Court) मानहानीच्या खटल्यात त्यांना दोषी ठरवलं होते. ही शिक्षा सुनावल्यानंतर 24 तासातच लोकसभा (Loksabha) सचिवालयाने राहुल गांधींवर मोठी कारवाई करत त्यांची खासदारकी रद्द करण्याची घोषणा केली आहे. यानंतर काँग्रेस पक्ष (Congress Party) हा आक्रमक झाला असून पक्षाकडून मोठे आंदोलन करण्याची योजना आखली जात आहे. राहुल गांधी ही आपल्याविरोधात झालेल्या कारवाईवरुन आता सरकारवर (Modi Govt) जोरदार हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. आज दुपारी एक वाजता राहुल गांधी पत्रकार परिषद घेणार असून खासदारकी रद्द झाल्यानंतरची ही त्यांची पहिली पत्रकार परिषद असेल. (Rahul Gandhi's Disqualification as MP: काँग्रेस पक्षाकडून मोठ्या आंदोलनाची योजना, वायनाड काँग्रेस युनिट काळा दिवस पाळणार)

दिल्लीच्या काँग्रेस मुख्यालयातून दुपारी एक वाजता काग्रेस नेते राहुल गांधी हे पत्रकार परिषद घेणार आहे. काँग्रेसच्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन ही माहिती देण्यात आली आहे.  या पत्रकार परिषदेतून राहुल गांधी हे मोदी सरकारवर जोरदार टिका करण्याची शक्यता आहे. यावेळी राहुल गांधी हे भाजप सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर यांच्यावर आरोप करण्याची शक्यता आहे.

दरम्यान राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून देशव्यापी आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. काँग्रेस यावेळी मोठ्या आंदोलनाची तयारी करत असून या आंदोलनाबद्दलची माहिती देखील राहुल गांधी या पत्रकार परिषदेत देण्याची माहिती शक्यता आहे.