Rahul Gandhi यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या इंग्रजांना दिलेल्या माफीनाम्याचं वाचन; Bharat Jodo Yatra रोखून दाखवण्याचं सरकारला आव्हान

महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा रोखून राहुल गांधीना अटक करण्याची मागणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी देखील केली आहे.

Rahul Gandhi | PC: Twitter/ANI

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा ( Bharat Jodo Yatra) सध्या महाराष्ट्रामध्ये आहे. काही दिवसांपूर्वी बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये बोलताना राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेवरून भाजपाने त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मला आमच्या आदिवासी समाजाला त्यांचे हक्क मिळवून द्यायचेत, असं म्हणणारे भगवान बिरसा मुंडे कुठे? आणि अंदमानच्या जेलमधून बाहेर काढा, मी तुमची वाटेल ती मदत करतो म्हणत इंग्रजांना मदत करणारे सावरकर कुठे? असं वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं आणि त्यावरून आता वांग सुरू झाला आहे. पण आजही राहुल गांधी आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राहुल गांधींनी त्याचे पुरावे सादर करत सावरकरांच्या माफीनाम्याचे वाचन केले आहे. तसेच सरकारला 'भारत जोडो यात्रा बंद करून दाखवाच' असं आव्हान दिले आहे.

राहुल गांधी यांनी सादर केलेल्या माफीनाम्यामध्ये ,'मी तुमचा नोकर राहू इच्छितो 'असे सावरकर यांनी म्हटल्याचा त्यांचा दावा आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही हा माफीनामा बघून घ्यावा. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रजांची मदत केली, याचा पुनरुच्चार राहुल गांधी यांनी करताना त्यांच्या कृतीमुळे महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांचा विश्वासघात केल्याचंही म्हटलं आहे. नक्की वाचा: Rahul Gandhi यांच्या Bharat Jodo Yatra दरम्यान वाशिम मध्ये 'जन गण मन' ऐवजी वाजलं नेपाळचं राष्ट्रगीत; व्हिडिओ वायरल (Watch Video).

पहा ट्वीट

दरम्यान काल राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा दाखला खासदार राहुल शेवाळे यांनी देत महाराष्ट्रातच त्यांची यात्रा रोखावी अशी मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राज्य सरकारने राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा रोखून त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी देखील केली आहे. राहुल गांधींकडून सावरकरांची बदनामी केली जात असल्याचा त्यांचा दावा आहे.