IPL Auction 2025 Live

Rahul Gandhi: सोनिपतमध्ये राहुल गांधीनी शेतकऱ्यांशी साधला संवाद, भात लावण्यास ही केली मदत

यावेळी त्यांनी शेतात मजूर आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.

Rahul Gandhi Rides Tractor (Pic Credit - ANI Twitter)

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे काही दिवसांपूर्वी दिल्लीत वाहने दुरुस्त करणाऱ्या दुकानात काम करण्याचा अनुभव घेतला. त्यानंतर आज राहुल गांधी आज थेट शेताच्या बांधावर दिसले. त्यांनी आज सकाळी सकाळी हरियाणातील (Haryana) सोनीपत (Sonipat) येथील एका गावात भात लावणी केली. त्यासोबत गांधी यांनी ट्रॅक्टरही चालवला. राहुल गांधी हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) येथे जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी त्यांना रस्त्यात सोनीपत येथील मदीना गावात भात लावणी सुरू होती. त्यावेळी अचानक राहुल गांधी हे भात लावणी करण्यासाठी शेतात पोहोचले. (हेही वाचा - West Bengal Panchayat Elections: पश्चिम बंगाल पंचायत निवडणुकीपूर्वी तृणमूलच्या 4 कार्यकर्त्यांची हत्या, आरोप-प्रत्यारोपाचा खेळ सुरू)

राहुल गांधी यांनी यावेळी मजुरांसोबत शेतात लावणी केली, त्यासोबत शेतात ट्रॅक्टरही चालवला. यावेळी त्यांनी शेतात मजूर आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. राहुल गांधींना अचानक पाहून शेतातील सर्वच मजूर चकीत झाल्याचे पाहायला मिळालं. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी हे दिल्ली येथील करोल बाग येथील सायकलच्या बाजारात पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी बाजारातील कामगार आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधला होता. यावेळी गांधी यांनी गॅरेजवाल्यांशीही संवाद साधला. सायकलच्या बाजाराला भेट दिल्यानंतर राहुल गांधी यांनी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

पाहा पोस्ट -

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला पाठिंबा मिळवण्यासाठी राहुल गांधी समाजाच्या विविध स्तरातील लोकांना भेटत आहेत. नुकतीच त्यांनी दिल्लीतील करोलबाग भागातील बाईक मेकॅनिक वर्कशॉपला भेट दिली. गांधी वर्कशॉपमध्ये मेकॅनिक्सशी संभाषण करताना आणि तुटलेल्या मोटारसायकली दुरुस्त करण्याचा प्रयत्न करताना दिसले.