Guna Incident: 'आमची लढाई अन्याविरुद्ध', गुना येथील पोलीस शेतकरी मारहाण प्रकरणावर राहुल गांधी यांची प्रतिक्रिया
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही शिवराज सिंह चौहान सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. कमलनाथ यांनी ट्विट करत म्हटले आहे की, शिवराज सिंह चौहान सरकार मध्य प्रदेश राज्याला कुठे घेऊन चालले आहे? असा सवाल विचारला आहे.
मध्य प्रदेश (Madhya Pradesh पोलिसांनी एका शेतकरी कुटुंबाला केलेल्या बेदम मराहणीनंतर त्या कुटुंबाने कीटकनाशक प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या क्रूर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाला आणि प्रकरण तापले. काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष (Former President Of Congress) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही या घटनेची दखल घेत आपल्या ट्विटर हँडलवरुन या घटनेचा व्हिडिओ पोस्ट करत 'आमची लढाई अन्याविरुद्ध आहे', असे म्हटले आहे. दरम्यान, मध्य प्रदेश सरकारने संबंधित घटनेची नोंद घेत जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याचे पोलीस प्रमुख यांची तातडीने बदली केली आहे. मध्य प्रदेश राज्यातील गुना शहर परिसरात असलेल्या जगनपूर येथे सरकारी मॉडेल महाविद्यालय (Model Collage) उभाण्यासाठी अधिग्रहीत करण्यात आलेल्या जमीनीवर अतिक्रमण केल्याचे सांगत पोलिसांनी कारवाई केली. या वेळी एका कुटुंबाला मारहाण केल्याचे ही घटना आहे. हे कुटुंब दलित (Dalit Family) असल्याचे समजते.
या घटनेमुळे मध्य प्रदेशचे राजकारण ढवळून निघाले आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही शिवराज सिंह चौहान सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. कमलनाथ यांनी ट्विट करत म्हटले आहे की, शिवराज सिंह चौहान सरकार मध्य प्रदेश राज्याला कुठे घेऊन चालले आहे? हे कुठला जंगलचा कायदा आहे? एका दलित कुटुंबावर पोलिसांकडून अमानुष लाठीचार्ज. कायदा हातात घेऊन पोलिसंकडून शेतकरी, त्याची पत्नी आणि मुलाला क्रूर मारहाण. हे सर्व केवळ तो शेतकरी गरीब आणि दलित कुटुंबातील आहे म्हणून? या सर्व प्रकाराची चौकशी होऊन दोषींना योग्य ती शिक्षा करावी अन्यथा काँग्रेस शांत बसणार नाही, असा इशाराही कमलनाथ यांनी शिवराज सिंह चौहान सरकारला दिला आहे.
राहुल गांधी (ट्विट)
दरम्यान, या प्रकाराचा व्हिडिओ समोर येताच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गुना येथील जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रमुख अशा दोघांची बदली करण्याचे आदेश दिले आहेत. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी म्हटले आहे की, सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची उच्चस्थरीय चौकशी केली जाईल, असेही मिश्रा यांनी या वेळी सांगितले. घटनेची चौकशी करण्यासाठी एक पथक भोपाळवरुन गुना येथे जाणार असल्याचेही समजते. (हेही वाचा, Vikas Dubey Arrested: कानपूर एन्काऊंटर प्रकरणातील कुख्यात गुंड विकास दुबे याला उज्जैन मधून अटक)
कमलनाथ, माजी मुख्यमंत्री, मध्य प्रदेश (ट्विट)
मध्य प्रदेश गृहमंत्री नरोत्तम मिश्रा ट्विट
काय आहे प्रकरण?
प्राप्त माहितीनुसार, कौंट पोलीस ठाणे परिसरातील जगतपूर येथील अतिक्रमण हटविण्यासाठी पोलीस आणि महसूल विभागाचे पथक मंगलवारी (14 जुलै) दाखल झाले होते. गुना शहर परिसरात असलेल्या जगनपूर येथे मॉडेल कॉलेज उभारण्यासाठी अधिगृहीत करण्यात आलेल्या जमीनीचा गेल्या 20 वर्षांपासून बेकायदेशीररीत्या काही लोकांकडून शेती आणि इतर गोष्टींसाठी वापर केला जात आहे. या जमीनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठीच हे पथक गेल्याचे प्रशासनाचे म्हणने आहे. या वेळी पथकाकडून तिथल्या जामीनीवर बोलडोजर फिरविण्यात आला. आपल्या पीकावर बुलडोजर फिरविण्यात येत असल्याचे पाहून तिथल्या शेतकऱ्याने आणि त्याच्या पत्नीने कीटकनाशक प्यायले. दरम्यान, एकूण सर्वच घटनेचा तपास सुरु असून, पोलीसांत गुन्हाही नोंद झाला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)